परभणी शहरातील घटना: महावितरणच्या कर्मचाºयास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:12 IST2018-02-03T00:11:58+5:302018-02-03T00:12:03+5:30
वीज बिलासंदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास दोघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शहरातील आझाद कॉर्नर परिसरात घडली.

परभणी शहरातील घटना: महावितरणच्या कर्मचाºयास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वीज बिलासंदर्भात सूचना देण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाºयास दोघांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शहरातील आझाद कॉर्नर परिसरात घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, महावितरणचे तंत्रज्ञ लव रविंद्रसा पवार (३०) हे वीज बिलासंदर्भात सूचना देण्यासाठी शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास आझाद कॉर्नर परिसरात गेले होते. यावेळी ते म.युसूफ अन्सारी यांच्याशी चर्चा करीत असताना आरोपी म.शकील म.युसूफ व अन्य एका व्यक्तीने त्यांना थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत लव पवार यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानंतर म.शकील म.युसूफ व अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नानलपेपोलीस उपनिरीक्षक शिरीषकुमार देशमुख करीत आहेत.