परभणीतील व्यापाºयांचे आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:36 AM2017-12-17T00:36:13+5:302017-12-17T00:36:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : एलबीटीच्या वसुलीला शासनाने स्थगिती दिली असली तरी महापालिकेने सील केलेली दुकाने जोपर्यंत उघडली जात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एलबीटीच्या वसुलीला शासनाने स्थगिती दिली असली तरी महापालिकेने सील केलेली दुकाने जोपर्यंत उघडली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा येथील व्यापाºयांनी घेतला आहे़ त्यामुळे शनिवारीही दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवून धरणे आंदोलन करण्यात आले़
स्थानिक संस्था कराच्या वसुली संदर्भात महापालिकेच्या भूमिकेविरूद्ध शहरातील व्यापाºयांनी ८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन आणि १३ डिसेंबरपासून दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी देखील नागपूर येथे उपोषण केले होते़ त्यामुळे शासनाने एलबीटी वसुलीला स्थगिती देण्याचा आदेश दिला़ मात्र एलबीटी वसुलीच्याच कारणास्तव मनपाने चार दुकाने सील केली आहेत़ ५५ दिवसांपासून ही दुकाने बंद असून, ही दुकाने जोपर्यंत उघडली जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय व्यापाºयांनी घेतला आहे़