यू आर टू गुड!

By admin | Published: July 9, 2015 06:58 PM2015-07-09T18:58:10+5:302015-07-09T18:58:10+5:30

हे स्वत:ला कसं सांगाल? स्वत:विषयी आदर बाळगा.

You're so good! | यू आर टू गुड!

यू आर टू गुड!

Next
>- हे स्वत:ला कसं सांगाल?
स्वत:विषयी आदर बाळगा.
हे वाक्यच तसं टिपीकल आहे.
पण तो आदर कमवायचा कसा? खचून जाणा:या परिस्थितीत आपण टिच्चून उभं कसं राहायचं? स्वत:च्या चुका मान्य करूनही आपण आपल्या ताकदीवर कसा विश्वास ठेवायचा हे सारं आपण शिकून घेतलं पाहिजे.
पण ते सारं करायचं कसं?
त्यासाठीच या काही गोष्टी करून पहा.
 
*  रोज रात्री आपण आज काय काय केलं याचा एक ठोकताळा घ्यायची सवय लावून घ्या.
* आपण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये स्वत:ला कसं हाताळलं, काय चुका केल्या, काय योग्य केलं याचा विचार करा. अशाने तुम्हाला स्वत:कडेच पाहण्याचा एक सुदृढ दृष्टिकोन मिळतो. मन खचत नाही आणि जे चुकलं ते सुधारण्याची संधीही मिळते.
 
* तुमच्या कर्तबगारीचीही एक लेखी नोंद ठेवा. लहान-मोठे जे काही यश तुम्हाला लाभते, त्याचा एका अर्थाने हिशेब ठेवा. जेव्हा स्वत:वरचा विश्वास दुर्बल होतो, या यादीकडे पाहा, तुम्हाला बळ मिळेल. 
अनेकदा आपल्याला स्वत:च्या चुका आठवतात, पण स्वत:ची चांगली कामं काही आठवत नाहीत. आपल्याला काहीच जमत नाही असं वाटतं. त्यापेक्षा चांगल्या कामांची यादीच समोर असलेली बरी!
 
* कोणतीही नवी कामगिरी हाती घेताना आपण हे करण्यासाठी समर्थ आहोत का, मला जमेल का, असा प्रश्न स्वत:ला विचारण्याऐवजी सांगा स्वत:ला- ‘आय विल ट्राय माय लेव्हल बेस्ट!’ निष्कर्षावर फोकस करण्यापेक्षा प्रयत्नांवर भर द्या. तुम्हाला नक्कीच स्वत:चा अभिमान वाटेल.

Web Title: You're so good!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.