इन प्रेज ऑफ स्लोनेस हे पुस्तक वाचलंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 03:38 PM2018-08-02T15:38:04+5:302018-08-02T15:38:39+5:30

स्पीडनं आपल्याला इतकं पछाडलंय त्याचे शरीर, मनावरचे परिणाम तर तपासा.

in Praise of slownes- interesting book | इन प्रेज ऑफ स्लोनेस हे पुस्तक वाचलंय?

इन प्रेज ऑफ स्लोनेस हे पुस्तक वाचलंय?

googlenewsNext
ठळक मुद्देतुम्हाला जर हा विषय असाच वेगात समजून घायचा असेल तर त्याचं टेड टॉकही तुम्ही यू टय़ूबवर ऐकू शकता. 

-प्रज्ञा शिदोरे    

आपण एका वेगवान जगात राहतो. आपल्याला सगळ्या गोष्टी ‘आज आत्ता ताबडतोब’ हव्या असतात. मग तो इंटरनेटचा स्पीड असो, व्हाट्सअ‍ॅपवरचा रिप्लाय असो, गाडीचा वेग असो किंवा आपली नाती असोत. सगळं इन्स्टंट! कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी ‘उपभोगाची’ सवय आपल्याला लागली आहे. ज्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ द्यायलाच हवा तेदेखील आपल्याला वेगात हवंय सध्या. परवाच एक पाटी पाहिली - म्हणे ‘स्पीड-योगा’. हे सगळं हसायला ठीक आहे हो. पण ही गोष्ट हसण्यावारी नेण्यासारखी नाहीये. एवढं वेगात पळताना हा वेग आपल्या शरीरावर, मनावर काय परिणाम करत असतो हे आपल्याला कळतच नाही. आपण वेगवान आयुष्य तर जगतच असतो; पण चांगलं आयुष्य जगायला विसरूनच जातो. 
औद्योगिक क्र ांतीनंतर आपलं अख्खं जगच एका हायस्पीड गिअरमध्ये गेलं. आणि या वेगाच्या पंथामुळे आपण सगळे त्या वेगाचे भक्त एका कडेलोटावर येऊन थांबलो आहोत, असं ‘इन प्रेज ऑफ स्लोनेस’चा लेखक कार्ल ओनर म्हणतो. 
गांधींनी त्यांच्या ‘हिंद स्वराज्य’ हा पुस्तकात वेगवान आगगाडय़ांवरही ताशेरे मारले आहेत. त्यांच्या मते वेगामुळे होणारे मोठे बदल आपल्या मेंदूला पचत नाहीत आणि मग सगळाच लोचा होऊन बसतो. काहीशा याच विषयावर आधारित अशी ब्रिटनमध्ये ‘स्लो फूड’ मुव्हमेण्ट सुरू झाली. माणसाने अन्नाकडे अधिक समंजसपणे पाहावं आणि तसं करणं हेच आपल्या शरीरासाठी योग्य आहे, असं त्यांचं म्हणणं.    
कार्ल ओनरचं हे पुस्तक आपल्याला सगळ्या गोष्टींकडे डोळसपणे बघायला शिकवतं आणि त्याचं महत्त्व पटवतं. 
तुम्हाला जर हा विषय असाच वेगात समजून घायचा असेल तर त्याचं टेड टॉकही तुम्ही यू टय़ूबवर ऐकू शकता. 
बघा पटतंय का?  

 

Web Title: in Praise of slownes- interesting book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.