झूठ बोले खुद को काटे..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 02:00 AM2017-12-28T02:00:00+5:302017-12-28T02:00:00+5:30

आपण इतरांशी तर खोटं बोलतोच, स्वत:शी तर त्याहून जास्त वेळा बोलतो. सतत कारणं देत, खोटंनाटं सांगत स्वत:लाच फसवतो. का कशासाठी? का खोटं बोलतो आपण?

Lied to yourself. | झूठ बोले खुद को काटे..

झूठ बोले खुद को काटे..

Next

प्रज्ञा शिदोरे

माणूस. फसवणूक करण्यात माहीर. इतरांचीच नाही तर अनेकदा स्वत:ची फसवणूकही अगदी सहज करत असतो. ज्यागोष्टी खोट्या आहेत त्यावरही माणूस पटकन विश्वास ठेवू शकतो. आणि त्याउलट ज्या बरोबर आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायला खूप वेळ घेतो. आपण आपल्या आयुष्यात अशी अनेक गोष्टींत फसवाफसवी करत असतो. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट असो नाहीतर आपलं आयुष्य ज्यावर बेतलेलं आहे अशा सर्वच गोष्टींबद्दल आपण खोटं बोलत असतो. म्हणजे अगदी आज आपण किती खाल्लं, आपलं वजन किती आहे, इथपासून ते आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात, आपलं व्यसनांबद्दल काय मत आहे किंवा आपल्याला कोणत्या राजकीय पक्षाबद्दल सध्यातरी आपुलकी वाटते आहे. हे सगळंच अनेकदा फसव्या समाजांवर आधारलेलं असतं. हे कमीच म्हणून आपण आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या विषयांबद्दल सुद्धा खरी मतं मांडत नसतो. जसं, आपण अमुक एका व्यक्तीशीच का लग्न केलं, किंवा आपण कामाचं क्षेत्र हेच का निवडलं?
एवढंच काय तर आपण खोटं बोलतो का, या प्रश्नालाही आपण कदाचित खोटंच उत्तर देऊ!
असं सगळं खोटंखोटं वागून खोट्या जगात राहून आपल्याला त्रास होतंच असतो. हे आपल्यालाही कळत असतं. आपण मग माणूस खोटं का बोलतो? डॉक्टर कोर्टनी वॉरनच्या मते आपण खोटं बोलतो कारण, सत्य पचवण्याची, किंवा ऐकण्याची ताकद आपल्या स्वत:मध्येच नसते. दुसºयांचं जाऊद्या हो, पण एखादी गोष्ट जी आपण करत असतो ती आपल्यालाच खरंतर मान्य नसते, पण मोह, सवय, सामाजिक वलय किंवा इतर काही कारणांमुळे आपण ती मान्य करत नसतो. स्व:लाच! म्हणून आपण आपल्या अनेक निर्णयांबद्दल, सवयी आणि निवडींबद्दल काही समाजमान्य उत्तरं तयार ठेवतो. तीच ती सोईस्कर उत्तरं देऊन मोकळे होतो. याचं एक महत्त्वचं कारण म्हणजे आपली स्वत:चीच आपल्या निर्णयांचे परिणाम पेलायची तयारी झालेली नसते.
डॉक्टर वॉरन म्हणतात की आपली ही खोटं बोलण्याची सवय आपण तान्हं असल्यापासून सुरु होते. तेंव्हाच आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्याला माणूस म्हणून तयार करत असते. त्या परिस्थीशी जुळवून घेण्यासाठी आपण स्वत:ला फसवून वागत असतो. त्यांच्यामते आपले विचारही आपल्याला फसवत असतात. जसं जर आपण डाएट करत असू आणि आपण एक बिस्कीट खाल्ले तर आपण तो अख्खा दिवस वेडंवाकडं खातो कारण आपलं डाएट तर खराब झालंच आहे ना,मग खा आता!
हे सगळं नेमकं कसं घडतं ते तुम्ही डॉक्टर वॉरनच्या या टेड टॉकमध्ये जरुर ऐका. आपण का खोटं बोलतो, आणि मुख्यत: खोटं बोलायला कसं शिकतो याची अतिशय सखोल पण सोप्या शब्दांतली ही मांडणी आपल्याला आपलंच एक रुप दाखवते.
या फसवणुकीमुळे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो. त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण माणूस आहोत ही! त्यामुळे चुका झाल्या म्हणजे काहीतरी आक्र ीत घडलं आहे, आपण असं केलंच कस असं आपल्या मनाला वाटायला लागत. त्या लपवण्यासाठी आपण खोटेपणा करतो. ज्या गोष्टी आपल्याला कधीच टाळता येत नाही अशा गोष्टींपासून पाळण्यासाठी आपण खोटं बोलतो. पण स्वत:ला हे सांगत नाही की मी चुकलो. माणूस आहे, चुकूच शकतो. चूक मान्य केली, सुधारली की खोटं बोलण्याचा काय प्रश्न.
पण आधी आपण स्वत: स्वत:शीच करत असलेला खोटेपणा ओळखायला हवा. तसं केल्यास आपल्याला मानिसक शांती लाभते असं मानसशास्त्रज्ञ ज्युडी केटलर म्हणतात. आणि न केल्यास आपल्याला खूप दु:खाचा सामना करावा लागतो, पश्चाताप तुम्हाला घेरतो. तुम्हाला कोणत्याच कामात टिकून राहता येत नाही असं डॉक्टर वॉरन म्हणतात.
आपण सगळ्यांनीच असा दुसºयाशी आणि स्व:शी असलेला खोटारडेपणा केला आहेच. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नसलो तरी भविष्य नक्कीच बदलू शकतो.
क्षणिक आनंदासाठी आपलय माझं भविष्य पणाला लावायचं नाही हे ठरवूच शकतो.
त्यासाठी हा लेख वाचा आणि टेड टॉक पहा.

पाहा
टेड टॉक - ‘ऑनेस्ट लायर्स’
 https://www.youtube.com/watch?v=YpEeSa6zBTE&t=5s
वाचा
न्यूयॉर्क टाइम्स मधला लेख वाचा
हाऊ ऑनेस्टी कॅन मेक यु अ हॅपी पर्सन
https://www.nytimes.com/2017/09/19/well/mind/how-honesty-could-make-you-happier.html

किती खरं बोललो याची डायरी
ज्युडी केटलर हे मानसशास्त्रज्ञ सच्चेपणाबद्दल बोलताना एक ‘आॅनेस्टी जर्नल’ ठेवण्याबद्दल सुचवतात.
म्हणजे एक सच्चेपणाची रोजीनीशी.
यामध्ये अशा घटनांबद्दल लिहायचं जेव्हा तुम्हाला खोटं बोलण्याचा, सत्य टाळण्याचा मोह झाला, लोकांनाही बोलताना किंवा अगदी स्वत: विचार करतानाही. आण ितेंव्हा तुम्ही काय केलंत आणि का हे लिहून काढायचं. अशा प्रकारच्या सवयीमुळे आपण स्वत:ला स्वच्छ दिसू लागतो आणि ओळखायला लागतो. असं झाल्यावर लोकांचं मन न दुखावता त्यांना सत्याची जाणीव करून देणंही आपल्याला सहज जमेल असं केटलर म्हणतात. त्यानं आपल्याला खोटेपणाची खोल कुठेतरी बोच राहते आणि मुख्य म्हणजे त्याला उत्तम होण्याची संधी आपण नाकारतो.

Web Title: Lied to yourself.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.