बघू..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 02:53 PM2018-05-10T14:53:38+5:302018-05-10T14:53:38+5:30

पदवीचं शिक्षण पूर्ण झालं. कुणालाच माहिती नाही, काहीच कळत नाही. मग मुलामुलींना एकदम जाग येते, पुढं करणार काय आपण?

Let's see .. | बघू..

बघू..

Next

- प्रो. किशोर डंभारे,
विद्याभारती कॉलेज, सेलू, वर्धा


शैक्षणिक वर्ष संपत आलं...
परीक्षांचे दिवस.
महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तातडीनं आपलं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बदलवून टाकलं. आय अ‍ॅम बिझी, स्टडी टाइम, डोण्ट डिस्टर्ब मी, असं स्टेटस ठेवून तरु णाई अभ्यासाला हात धुवून लागली आहे, की तसा भास निर्माण करत आहे नाही सांगता येणार; पण पासिंगपुरते का होईना मार्क मिळावेत इतपत अभ्यासाला लागलीय हे दिसतेय हे खरं. आता नोट्सची जुळवाजुळव, पुस्तकाच्या लाइन्स अण्डरलाइन करणं सुरू झालं. प्रोजेक्ट सबमिशन, असाइनमेंट सबमिशनची झुंबड उडाली. हॉल तिकीटसाठी क्लिअरन्स फॉर्म भरून व विचारल्यास सर पटकन सही करा अभ्यास करायचा आहे, अशी लगीनघाई सुरू झालेली.
अशा धावपळीतच एक नोटीस येते, अमुक-अमुक तारखेला फायनल इअरच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे. सगळ्यांनी हजर राहावं आणि पुन्हा वेगळ्या धावपळीला सुरुवात होते. मग एक वेगळीच धांदल. कपडे कुठले घालायचे, काही ड्रेस कोड ठेवायचा का फक्त फायनल इअरच्या स्टुडण्ट्ससाठी, ओळखायला यायला पाहिजे आपण सिनिअर आहोत, आता आम्ही पदवीधर होणार, भाषणात काय काय बोलायचं इथपर्यंतची तयारी सुरू होते. सोनेरी पंखांच्या दिवसाचे कॉलेजातले अनुभव शेअर करण्याची वेळ आली आहे. साश्रूनयनांनी निरोप द्यायचा, की भन्नाट गँगचा मेंबर सांगायचं, जीव कासावीस झाला म्हणायचे, की सुटलो एकदाचे बॉ म्हणायचे, कंटाळलो होतो त्या बोरिंग लेक्चरला म्हणायचे. सगळे छान आहे म्हणायचं की मनातली सल, आलेला कढ, कटु अनुभव शेअर करायचा, असं सगळं डोक्यात सुरू झालेलं असतं.
फेअरवेल पार्टीचा दिवस उजाडतो. कॉलेजच्या प्रेक्षागृहाजवळ गोंधळ, हास्याचे फवारे, एकमेकांच्या हातावर दिलेल्या टाळ्यांचा आवाज. तरुणाईचा उत्साह ओेसंडून वाहताना दिसतो. यापुढे आपण याच महाविद्यालयात एक्स स्टुडण्ट म्हणून येणार, माजी विद्यार्थी ठरणार असा अविर्भाव चेहºयावर झळकताना दिसतो. अचानक आवाज येतो शांत राहा, लवकरच कार्यक्रम सुरू होतोय. स्वागत होते. आज पहिल्यांदाच पाहुण्यांप्रमाणे स्वागत, आठवणी, केलेली धम्माल मस्त, लेक्चरला मारलेली दांडी, आॅफ पिरीअडमधली दंगामस्ती, ग्रंथालयातली कुजबुज, क्रीडा स्पर्धेतली चुरस हे सगळे भाव आता चेहºयावर झळकताना दिसतात. मनोगत होते. सगळा उजाळा मिळतो. आता मान्यवरांच्या शुभेच्छा उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद आणि अचानक मान्यवरांकडून एक प्रश्न विचारला जातो. पदवीनंतर पुढे काय? कारण अंगडाईचे दिवस संपलेत आता, आयुष्याच्या लढाईला सज्ज होण्याची वेळ आली. सांगा पुढे काय...
अचानक सगळ्यांच्या मनात धस्स होतं. खरंच पुढे काय? एकमेकांकडे सगळे बघतात, प्रत्येकाच्या डोळ्यात एकच प्रश्न तू काय करणार, माझं अजून ठरलं नाही. काही मुलींचं बरं असतं कदाचित लग्न ठरवतील घरचे. काही मुली जमल्यास पुढचं शिक्षण घेतील. काही मात्र जिद्दी, नोकरी करायची आहे मला म्हणत शोधाशोध सुरू करतील. मुलांचं थातुरमातुर उत्तर पीजी करणार, घरचा व्यवसाय करणार, बाबांना मदत करणार, काहींचं स्पर्धा परीक्षा, काही लगेच जॉब करणार घरी आता मदत करायला हवी, आर्थिक परिस्थिती बेताची आहे...
उत्तरं अनेक, चेहरे मात्र अनेक प्रश्न घेऊन पांढरे पडलेले. कारण आजपर्यंत विचारच केला नाही, असा प्रश्नच पडला नाही किंवा कुणी विचारलासुद्धा नाही, विचारलंही असेल तर वेळ आहे असं उत्तर द्यायची वेळ मात्र निघून गेली.
प्रेक्षागृहात भयाण शांतता.. डोक्यात प्रश्नच प्रश्न.
बघू ....
बुचकळ्यात पडलेले सगळे चेहेरे या एकाच शब्दावर स्थिरावतात. भविष्याच्या काळजीच्या सगळ्या सुरकुत्या एकाच वेळी सगळ्यांच्याच चेहºयावर उमटतात इतकंच. खरंच हा विचार आधी का केला नाही आपण, इतके सुसाट जगत होतो, ज्या विचाराची गरज होती तोच का केला नाही. खरंच चुकलो का, बापरे किती कठीण आहे सगळे पुढे, कुठे जावे, काय करावे, सरकारी नोकरी करावी तर ती मिळवणे इतकी सोपी नाही, वेळपण कमी, स्पर्धा वाढलेली, कार्पोरेटमध्ये जावे तर स्किलचा प्रॉब्लेम, खासगी सेक्टरमध्ये सगळी मनमानी, पिळवणूक, कम्युनिकेशन स्किलचा प्रॉब्लेम, प्रेझेण्टेशनचा प्रॉब्लेम, त्यात आपण ग्रामीण भागातले, काही खेडेवजा शहरातले, अपने बस की बात नही यार, जमणार नाही आता, खूप वेळ झाला, आधीच विचार करून तयारी करायला पाहिजे होती. टिकू शकणार नाही या स्स्पर्धेच्या दुनियेत, कठीण आहे सगळे, कपड्यापासून तर बोलण्याच्या-वागण्याच्या ढबमध्येसुद्धा बाफल करणे गरजेचे, जमेल का सगळं, प्रश्नच प्रश्न.
काय करतील ही मुलं पुढे?
सापडेल सगळ्यांना वाट..
सापडेलही, झगडतीलही ते पुढे..


 

Web Title: Let's see ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.