प्रतिष्ठेच्या अडकित्त्यात नात

By admin | Published: September 3, 2015 08:43 PM2015-09-03T20:43:49+5:302015-09-03T20:43:49+5:30

बदलत्या सामाजिक वास्तवाच्या वेढय़ात बहीण- भावाचं नातं गुदमरतंय, त्याला जबाबदार कोण?

Grandfather of prestige | प्रतिष्ठेच्या अडकित्त्यात नात

प्रतिष्ठेच्या अडकित्त्यात नात

Next
>- अनंत पाटीलं
 
बदलत्या सामाजिक वास्तवाच्या वेढय़ात बहीण- भावाचं नातं गुदमरतंय, त्याला जबाबदार कोण?
 
प्रेमप्रकरणावरून जातीय हत्त्याकांडांचं प्रमाण
अ.नगर जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक. 
बहिणीनं प्रेमात पडणं,
आणि तेही जातीबाहेर;
हेच मान्य होऊ नये,
असं वातावरण का तयार होतंय?
त्याची कारणं काय?
त्याचाच एक अस्वस्थ रिपोर्ट..
 
तुझा भाऊ कसा वागतो? अधिक काळजीपोटी तुङया जगण्यात ढवळाढवळ तर करत नाही?.. काहीच मिनिटांपूर्वी जगभरातील भल्या-बु:यावर मनभर बोलणा:या एका तरुणीने या प्रश्नावर अचानक अबोला धरला..
मग म्हणाली, नाही कसंय. मला जरा काम आहे. आपण नंतर बोलूया का?.. तिच्या या प्रतिप्रश्नाने मलाही गप्प केलं! 
- अनेक तरुण मुलामुलींशी बोलताना असेच काही अनुभव आले. ज्या नात्याबद्दल कधी प्रश्नही उपस्थित करू नये, अशा एका तरल नात्यातील बदलांचा शोध हाताबाहेर जातोय, ही भावनाच अस्वस्थतेकडे नेणारी होती. 
बहीण-भाऊ! जगातलं सर्वात प्रवाही-तरल नातं. शुद्धतेचं प्रतीक. पण आजकाल सभोवताली घडणा:या काही घटना पाहिल्या की, या नात्यात सुरू झालेली घालमेल समाजरचनेचा तळ ढवळून काढत असल्याची जाणीव होते. 
गेल्या दोन वर्षातील अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या काही घटनांनी राज्याचे लक्ष वेधले. प्रेमप्रकरणातून होणा:या हत्त्यांमुळे कधी नव्हे एवढी नगरच्या समाजस्वास्थ्याची चर्चा राज्यभर झाली. पण त्यातील दोन घटना अशा आहेत, ज्यात हत्त्येचे आरोपी आहेत भाऊमंडळी!  त्याशिवाय गावचौक, कॉलेज कॅम्पसमधील ढीगभर हाणामा:या यांच्या संदर्भात केसेस दाखल होताहेत त्या वेगळ्याच. 
काय बिघडतंय याचा स्पष्ट अंदाज मुलामुलींच्या बोलण्यातून थेट येत नाही; पण सर्व आलबेल नाही, हे मात्र नक्की! पण ‘लोक काय म्हणतील’ या मेंदूला घट्टपणो चिकटलेल्या खुळचट संस्कारवाक्याला तर नव्या राजकीय उन्मादाने खतपाणीच घातले आहे. 
अ.नगर जिल्ह्यातील काही निरीक्षणो आहेत. सहकाराच्या विकासामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागही विकसित झाला. सुबत्ता आली, सुबत्तेसोबत येणारं जगही आलं! मोबाइल, फेसबुक वगैरे तर आता सामान्य झालंय. यासोबतच मेंदूत हजारो वर्षापूर्वी गाडून टाकलेली सरंजामशाहीची बीजं डोकं वर काढू लागल्याची लक्षणोही आहेत. त्याला बदलणा:या राजकारणाने यासाठी पूरक परिस्थिती तयार करून ठेवली आहे. काहीही केलं तरी चालतं ही नवी मानसिकताही बाळसं धरूलागली आहे, ती यातूनच! पुरुषी अहंकार गोंजारणारी ही व्यवस्था दिवसेंदिवस अधिकच बळकट होताना दिसते. याचा थेट परिणाम कौटुंबिक नात्यांवर उमटताना दिसतो. 
अधिकार स्वातंत्र्य हा सध्या आवडीचा विषय आहे. प्रत्येकाला आपली स्पेस हवी आहे. अर्थात तो त्याचा अधिकारही आहे. मात्र, आपण प्रगत समाजरचनेच्या टप्प्यार्पयत पोहचण्यासाठी सुरू केलेला प्रवास कधीच भरकटला आहे. किंबहुना हाच प्रवास उलटय़ा दिशेने सुरू झालेला दिसतो. प्रत्येकाला हवी असलेली स्पेस नवा अॅटिटय़ूड जन्माला घालतो अन् त्यातूनच संघर्षाची ठिणगी पडू लागली आहे. 
बहीण-भावाच्या नात्यातही याच बाबींनी शुष्कपणा आणण्यास सुरुवात केली आहे. एकप्रकारे अधिकार स्वातंत्र्याचा नवा संघर्ष या नात्यातही डोकावत आहे. आपल्या बहिणीवर कोणीतरी प्रेम करतो, हेच खपवून घेतले जात नाही. ‘त्याचा’ थेट खून करण्यार्पयत मारली जाणारी मजल काय सांगते? या घटनांतून जे समाजाभिसरण होत आहे, त्याची फलनिष्पत्ती अधिकच घातक आहे. भाऊ या विश्वासाच्या नात्याची जागा हेराने घेतली, ती याच कारणाने! बहिणीचा मोबाइल तपासणो, किती वेळ कोणाशी बोलते, याचा हिशेब मागणो हे प्रकार यातूनच घडत आहेत. ‘तिकडे’ जे घडले, ते आपल्याकडे घडू नये, ही भावना या नात्यावर अधिकच आघात करणारी ठरत आहे. भावाकडून लादली जाणारी बंधनं आणि ही बंधनं झुगारण्यासाठी बहिणींचा सुरू झालेला खटाटोप अनेक ठिकाणी प्रत्ययास येतो. 
एकप्रकारे समाज पुढारला, आधुनिक झाला; मात्र मध्ययुगीन पगडा हटायला तयार नाही. किंबहुना त्याचे फास अधिक घट्ट होत आहेत. वाढत जाणारी सामाजिक असुरक्षितता बहीण-भावाच्या नात्यावरही ओरखडे पाडत आहे. आणि तेच अधिक घातक, अधिक अस्वस्थ करणारं आहे!
 
 
 
मध्ययुगीन समाजमूल्यांचा पगडा काळाप्रमाणो आधुनिक व्हावा, बदलावा अशी अपेक्षा होती; मात्र तसे होताना दिसत नाही. या मूल्यांचे वेिषण करण्याची तसदीही घेतली जात नाही. ग्रामीण भागात तर ती जगण्याची रीत आहे, म्हणून बिंबवलं जातं. नव्या-जुन्याचा संघर्षही यातूनच वाढीस लागला आहे. नात्यातील हा संघर्ष उच्च मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गात अधिक आढळतो. अ.नगरसारख्या शहरात महाविद्यालयांच्या परिसरात हाणामा:या होण्याचे प्रमाणही वाढले आहे. प्रारंभी दोन टोळक्यांतील असलेला हा संघर्ष, तपास केल्यावर ब:याचदा बहीण-भावाच्या नात्यावर येऊन पोहचतो, ते गंभीर आहे.
- डॉ. वसंत देसले
मानसशास्त्रचे अभ्यासक

Web Title: Grandfather of prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.