गाजर खा, तेल लावा.

By admin | Published: November 6, 2014 04:41 PM2014-11-06T16:41:30+5:302014-11-06T17:04:32+5:30

थंडीत रखरखीत कोरड्या त्वचेचं करायचं काय?

Eat carrots, apply oil. | गाजर खा, तेल लावा.

गाजर खा, तेल लावा.

Next
>थंडी आली की तिच्या मागोमाग ‘कोरडे’पणा चालत येतोच. त्वचेवरचा ओलसर, तेलकटपणा उडून जातो आणि रखरखीत पांढरे ओरखडे त्वचेवर उमटू लागतात.
हा रखरखीतपणा टाळता यावा म्हणून काही गोष्टी आपण नक्की करु शकतो.
तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर पेट्रोलियम जेल बेस्ड असे प्रॉडक्ट निवडा. शिआ किंवा कोक बटर क्रिम तर सगळ्यात उत्तम.  प्रॉडक्ट घेताना क्रिमवरचा हा उल्लेख पाहून मग घ्या. त्या मॉयश्‍चुरायझर म्हणून काम करता. पण त्या चिपचिप्या असतात. त्यामुळे अशा क्रिम रात्री झोपताना लावणं उत्तम.
ज्यांची त्वचा ऑयली असेल त्यांनी वॉटर बेस्ड जेल मॉयश्‍चूरायझर वापरणं चांगलं.
आणि चिपचिप्या क्रिमचा ज्यांना काही त्रास होत नाही किंवा चालतो थोडा तेलकटपणा त्यांनी मॉयश्‍चूरायझिंग लोशन्सही वापरणं चांगलं.
चेहर्‍यासाठी सोप फ्री क्लिन्सर्स वापरा. साबणात अल्काईन असतं, त्यामुळं या काळात साबण वापरणं चांगलं.
ज्यांना अँक्ने म्हणजेच पुरळ, फोड आहेत त्यांनी जेलबेस्ड क्लिन्सर्स वापरावेत.
स्किन फारच सेन्सेटिव्ह असेल तर कोरफडयुक्त मॉयश्‍चूरायझर वापरणं चांगलं.
ऑलिव्ह, बदाम, खोबरेल तेल वापरून पंधरा दिवसांतून एकदा चेहर्‍याचा मसाज करावा.
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळेही ड्रायनेस खूप वाढतो. त्यामुळे व्हिटॅमिन ए असलेल्या भाज्या, गाजर, पालेभाज्या, अक्रोड खाणं चांगलं.
हे करुन पहा, चेहरा थंडीतही नक्की तुकतुकीत दिसेल !
- धनश्री संखे
ब्यूटी एक्सपर्ट

Web Title: Eat carrots, apply oil.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.