सलमान रिओ ऑलिम्पिकचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर कशासाठी ? - योगेश्वर दत्त

By Admin | Updated: April 24, 2016 10:40 IST2016-04-24T10:00:37+5:302016-04-24T10:40:22+5:30

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अभिनेता सलमान खानची भारताचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर कुस्तीपटू योगेश्वर दत्तने टीका केली आहे.

What is the brand ambassador of Salman Rio Olympic? - Yogeshwar Dutt | सलमान रिओ ऑलिम्पिकचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर कशासाठी ? - योगेश्वर दत्त

सलमान रिओ ऑलिम्पिकचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर कशासाठी ? - योगेश्वर दत्त

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २४ - यावर्षी ब्राझीलमध्ये होणा-या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अभिनेता सलमान खानची भारताचा ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर कुस्तीपटू योगेश्वर दत्तने टीका केली आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कास्यपदक मिळवणा-या योगेश्वरने सलमानची निवड जाहीर झाल्यानंतर काही तासातच टि्वटरवरुन आपला संताप व्यक्त केला
 
ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर म्हणून सलमानच्या निवडीवर त्याने प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. अॅम्बॅसिडर म्हणून सलमानची निवड करण्यामागचा उद्देश कोणी मला समजावून सांगले का ? असे टि्वट त्याने केले आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ६५ किलो वजनी गटात योगेश्वर आधीच पात्र ठरला आहे. 
 
शनिवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सलमानची ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली. शाहरुख खान, अमिताभ बच्चनही या स्पर्धेत होते. योगेश्वरने केलेल्या टीकेने सलमानचे चाहते मात्र संतप्त झाले आहेत. त्यांनी टि्वटरवरुनच योगेश्वरचा समाचार घेतला आहे. 
 
 

Web Title: What is the brand ambassador of Salman Rio Olympic? - Yogeshwar Dutt