राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : गौरव गोसावीने औरंगाबादच्या कुरेशीचा पराभव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 07:32 PM2019-02-27T19:32:44+5:302019-02-27T19:34:19+5:30

अमरावतीच्या वैभव शिंदेने नाशिकच्या संकेत तायडेचा रोमहर्षक लढतीत पराभव केला.

State level boxing event: Gaurav Gosavi defeated qureshi of Aurangabad | राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : गौरव गोसावीने औरंगाबादच्या कुरेशीचा पराभव केला

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा : गौरव गोसावीने औरंगाबादच्या कुरेशीचा पराभव केला

Next

मुंबई, २७ फेब्रु. (क्री. प्र.) महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून ना. म. जोशी मार्ग येथील शिवशंकर उत्सव मंडळाने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व मुंबई जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने ५ वी राज्यस्तरीय पुरुष प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धा गिरणगावात आयोजित केली आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या दहा गटात ७० खेळाडूंनी भाग घेतला असून आज झालेल्या सामान्यांमध्ये विजयी झालेले खेळाडू उद्या उपांत्य फेरीत खेळतील. आज झालेल्या सामन्यात ५२ किलो वजनी गटात पुण्याच्या गौरव गोसावीने औरंगाबादच्या कुरेशीचा ३-० असा पराभव केला तर अमरावतीच्या वैभव शिंदेने नाशिकच्या संकेत तायडेचा रोमहर्षक लढतीत पराभव केला.

५६ किलो वजनी गटात मुंबईच्या बिरु बिंदने नाशिकच्या अक्षय शिरसाटचा पराभव केला. तर ६० किलो वजनी गटात पुण्याच्या अक्षय मानेरेने कोल्हापूरच्या आतिश आराडेला पराभवाची धूळ चारली. ६४ किलो वजनी गटात पुण्याच्या ऋषिकेश रणदिवेने नाशिकच्या पंकज अडकमोलला पराभूत केले.

६९ किलो वजनी गटात औरंगाबादच्या कुणाल भांगेने नाशिकच्या हर्षल देशमुखला पराभूत केले तर ७५ किलो वजनी गटात पुण्याच्या अनिकेत शिंदेने औरंगाबादच्या अभिमन्यु कोटकवारवर ३-० असा दणदणीत विजय संपादन केला. याच गटात मुंबईच्या प्रथमेश नाडकरने सुध्दा ३-० असा कोल्हापूरच्या संकेत जाधववर विजय मिळवला.

७५ किलो वजनी गटात मुंबईच्या मृणाल झारेकरने कोल्हापूरच्या प्रशांत कांबळेवर ३-० असा पराभव केला तर ९१ किलो वजनी गटात अमरावतीच्या समीर अहमदने कोल्हापूरच्या आकाश नावडकरचा एकतर्फी पराभव केला.

Web Title: State level boxing event: Gaurav Gosavi defeated qureshi of Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.