जळगावांत गुरुवारपासून रंगणार किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:05 PM2018-12-04T17:05:39+5:302018-12-04T17:06:00+5:30

या स्पर्धेत २४ जिल्ह्यांचे किशोर-किशोरी संघ सहभागी होणार आहेत. या चारदिवसीय स्पर्धेचे अंतिम सामने ९ डिसें रोजी पार पडतील.

State Championship Kho-Kho Tournaments, which will start from Thursday in Jalgaon | जळगावांत गुरुवारपासून रंगणार किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

जळगावांत गुरुवारपासून रंगणार किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

googlenewsNext

जळगांव : येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व जळगांव जिल्हा खो-खो असोसिएशन आयोजित ३५ व्या किशोर-किशोरी (१४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे बिगुल उद्या (दि ६ डिसें) रोजी वाजणार आहे. या स्पर्धेत २४ जिल्ह्यांचे किशोर-किशोरी संघ सहभागी होणार आहेत. या चारदिवसीय स्पर्धेचे अंतिम सामने ९ डिसें रोजी पार पडतील. स्पर्धेतील सामने सकाळ व सायंकाळच्या सत्रात प्रकाशझोतात खेळवण्यात येतील. प्रथम साखळी व तदनंतर बाद पद्धतीने खेळवल्या जाणा-या यास्पर्धेत महाराष्ट्रातील बाल खेळाडूंचा रंगतदार खो-खो खेळ पहाण्याची संधी जळगावकरांना लाभणार आहे. दि.१५ ते १९ डिसें या कालावधीत उत्तराखंडातील रूद्रपूर येथे आयोजित २९व्या किशोर-किशोरी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेकरीता या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येणार असल्याने स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे होतील.

गतवर्षीच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत किशोर गटात सोलापूर तर किशोरी गटात पुण्याने पटकावलेले विजेतेपद यावर्षी देखील हे संघ राखू शकतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. स्पर्धेकरीता जय्यत तयारी चालू असून तीन मैदाने (कोर्ट) व सुसज्ज प्रेक्षक गॅलेरीची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येत आहे.

स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे :

किशोर विभाग:
अ गट: सोलापूर, बीड, धुळे
ब गट: पुणे, परभणी, लातूर
क गटः मुंबई उपनगर, मुंबई, नंदूरबार
ड गट: सांगली, रत्नागिरी, जळगांव
इ गटः औरंगाबाद,रायगड,सिंधुदुर्ग
फ गट:अहमदनगर, नाशिक,जालना
ग गट: ठाणे,पालघर,हिंगोली
ह गटःउस्मानाबाद, सातारा, नांदेड

किशोरी विभाग :
अ गट: पुणे,लातूर,रायगड
ब गट:उस्मानाबाद,मुंबई उपनगर,सिंधुदुर्ग
क गटःनाशिक,जळगांव,धुळे
ड गट:सोलापूर,जालना,परभणी
इ गटःअहमदनगर,मुंबई,बीड
फ गट:सातारा,ठाणे,हिंगोली
ग गट:पालघर,रत्नागिरी,नांदेड
ह गटःसांगली,औरंगाबाद,नंदुरबार

Web Title: State Championship Kho-Kho Tournaments, which will start from Thursday in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव