सानिया मिर्झा ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह; बघतोस ना बाळा, बाबा बॅटिंग करतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 03:25 PM2018-11-03T15:25:37+5:302018-11-03T15:25:50+5:30

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली.

Sania Mirza is active on Twitter; share funny pic with Izhaan | सानिया मिर्झा ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह; बघतोस ना बाळा, बाबा बॅटिंग करतोय...

सानिया मिर्झा ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह; बघतोस ना बाळा, बाबा बॅटिंग करतोय...

हैदराबाद : भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली. दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. शुक्रवारी सानियाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि लहानग्या इझानसह सानिया घरी परतली. प्रसुती काळात सोशल मीडियापासून दूर गेलेली सानिया ट्विटरवर पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे. तिने इझानचा फोटो पोस्ट करून ट्विटरवर कमबॅक केले. पण, या फोटोत एक गम्मत दडली आहे.




या फोटोत टिव्हीकडे पाहणारा इझानचा चेहरा दिसत आहे आणि टिव्हीमध्ये शोएब मलिक फलंदाजी करताना दिसत आहे. आपल्या बाळाला पाहिल्यानंतर शोएब त्वरित राष्ट्रीय कर्तव्यासाठी दुबईला रवाना झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तो खेळत आहे. शुक्रवारी या मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला आणि त्यात पाकिस्तानने सहा विकेट राखून विजय मिळवला. सानियाने तिच्या बाळासह या सामन्याचा आस्वाद लुटला. टिव्हीवर या सामन्याचे प्रक्षेपण पाहत असताना सानिया बाळाला बाबांची फलंदाजी पाहण्यास सांगत आहे.
''पाच दिवसापूर्वी या जगात आगमन झालेल्या इझानसह क्रिकेटचा आस्वाद घेत आहे. मी आणि इझान दोघही बाबांना फलंदाजी करताना पाहत आहोत, असे सानियाने ट्विट केले आहे. 


Web Title: Sania Mirza is active on Twitter; share funny pic with Izhaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.