Padma Award 2024: क्रीडा विश्वातील सात शिलेदारांना पद्मश्री पुरस्कार; महाराष्ट्रातील गुरूचाही सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 12:43 PM2024-01-26T12:43:07+5:302024-01-26T12:43:47+5:30

क्रीडा विश्वातील सात जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे.

Rohan Bopanna, Joshna Chinappa, Uday Vishwanath Deshpande, Gaurav Khanna, Satendra Singh Lohia, Purnima Mahato and Harbinder Singh will be honored with the Padma Award 2024 | Padma Award 2024: क्रीडा विश्वातील सात शिलेदारांना पद्मश्री पुरस्कार; महाराष्ट्रातील गुरूचाही सन्मान

Padma Award 2024: क्रीडा विश्वातील सात शिलेदारांना पद्मश्री पुरस्कार; महाराष्ट्रातील गुरूचाही सन्मान

Padma Award 2024 for Sports: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि स्क्वॅशपटू जोश्ना चिनप्पा यांची २०२४ च्या पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. खरं तर पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या यादीत मल्लखांबचे प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे, भारतीय पॅरा-बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक गौरव खन्ना, तिरंदाज पुरिमा महतो, पॅरा-स्विमर सतेंद्र सिंग लोहिया आणि माजी हॉकीपटू हरबिंदर सिंग यांचा समावेश आहे.

मल्लखांबचे प्रशिक्षक उदय देशपांडे हे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांना या खेळाचे गुरू म्हणून ओळखले जाते. हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते औपचारिक समारंभात प्रदान केले जातील. दरवर्षी मार्च किंवा एप्रिलच्या आसपास राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 

क्रीडा विश्वातील ७ जणांना पद्म पुरस्कार

  1. रोहन बोपन्ना - टेनिस 
  2. जोश्ना चिनप्पा - स्क्वॅश
  3. उदय विश्वनाथ देशपांडे - मल्लखांब
  4. गौरव खन्ना - पॅरा बॅडमिंटन 
  5. सतेंद्र सिंह लोहिया - जलतरण 
  6. पूर्णिमा महतो - तिरंदाजी 
  7. हरबिंदर सिंह - पॅरालिम्पिक तिरंदाजी 

बोपन्नाने रचला इतिहास 
तरूणाईला लाजवेल अशी कामगिरी करून ४३ वर्षीय रोहन बोपन्नाने इतिहास रचला. अलीकडेच तो पुरुष दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा टेनिस इतिहासातील सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरला आहे. बोपन्ना सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ च्या अंतिम फेरीतही त्याने मजल मारली आहे. 

मल्लखांबचे गुरू उदय देशपांडे 
उदय विश्वनाथ देशपांडे हे मल्लखांब या प्राचीने खेळाशी संबंधित आहेत. त्यांनी अनेक देशांतील खेळाडूंना या खेळाचे धडे दिले. १९९८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंदाज पुरिमा महतोने रौप्य पदक जिंकले होते. २००८ आणि २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. याशिवाय पॅरा बॅडमिंटन प्रशिक्षक गौरव खन्ना, पॅरा जलतरणपटू सतेंद्र सिंग लोहिया हे असे खेळाडू आहेत, ज्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल आणि भारतीय खेळातील योगदानासाठी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Rohan Bopanna, Joshna Chinappa, Uday Vishwanath Deshpande, Gaurav Khanna, Satendra Singh Lohia, Purnima Mahato and Harbinder Singh will be honored with the Padma Award 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.