कराडची प्रिशा पदार्पणात पदकाची मानकरी! आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 09:35 PM2023-09-08T21:35:20+5:302023-09-08T21:36:08+5:30

महाराष्ट्राची पहिली पदक विजेती

Prisha from Karad won a medal on her debut! Asian Cadet Taekwondo Championship; | कराडची प्रिशा पदार्पणात पदकाची मानकरी! आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप

कराडची प्रिशा पदार्पणात पदकाची मानकरी! आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी । लेबनाॅन

कराडच्या आगाशीवनगरची युवा खेळाडू प्रिशा शेट्टीने शुुक्रवारी आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा बहुमान पटकावला. तिने पदार्पणात पदक विजेती हाेण्याचा पराक्रम गाजवला. तिची लेबनाॅन येथील या  आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. यातून तिला पदकाचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला. कॅडेट गटामध्ये पदकाची मानकरी ठरलेली प्रिशा ही महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.  

सातारा जिल्ह्याची खेळाडू कुमारी प्रिषा शेट्टी हिला कॅडेट गट भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्यपदक मिळवले. ती मागील आठ वर्षापासून एपी स्पोर्ट्स आगाशीवनगर, कराडमध्ये तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यान तिला प्रशिक्षक अमोल पालेकर व प्रशिक्षक अक्षय खेतमर यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभले.यामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदकाचा बहुमान मिळवता आला. तिची नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीही काैतुकास्पद ठरलेली आहे.

सातारा जिल्हा आमच्युअर तायक्वांदो असोसिएशन माध्यमातून ती लहान पणा पासून सतत खेळत आहे.   तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे व सचिव संदीप ओंबासे सीईओ गफार पठाण, खजिनदार प्रसाद कुलकुर्णी यांचे पाठबळ लाभले. तसेच इंडिया तायक्वांदो चे अध्यक्ष माननीय नामदेव शिरगावकर यांचे पाठबळ व सहकार्य मुळेच आज या ग्रामीण भागातील मुलीने एवढे मोठे यश मिळवले आहे. सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Prisha from Karad won a medal on her debut! Asian Cadet Taekwondo Championship;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.