’राष्ट्रीय स्पर्धा वेळेवरच व्हाव्यात; अन्यथा खेळाडूंचे नुकसान’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 01:33 PM2018-12-09T13:33:08+5:302018-12-09T13:33:52+5:30

‘आयओए’ चे संयुक्त सचिवनामदेव शिरगावकर यांनी केली पाहणी : पुढील वर्षीचे राष्ट्रीय खेळाडूंचे कॅलेंडर व्यस्त

National competition should be timely; Otherwise the player's losses | ’राष्ट्रीय स्पर्धा वेळेवरच व्हाव्यात; अन्यथा खेळाडूंचे नुकसान’

’राष्ट्रीय स्पर्धा वेळेवरच व्हाव्यात; अन्यथा खेळाडूंचे नुकसान’

सचिन कोरडे : गोव्यात पुढील वर्षी होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात भारतीय आॅलिम्पिक संघटना (आयओए) पूर्णत: सकारात्मक आहे. त्यांचा आयोजकांवर पूर्ण विश्वास आहे, असे असले तरीही गोव्यात ज्या पद्धतीने स्पर्धेची तयारी सुरू आहे ती कुठेतरी संभ्रम निर्माण करणारी आहे. ही स्पर्धा वेळेवरच व्हायला हवी, नाही तर राष्ट्रीय खेळाडूंचे नुकसान होईल, असे मत भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे संयुक्त सचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केले.
शिरगावकर हे गुरुवारी गोव्यात होते. त्यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा ओझरता आढावा घेतला. ते मॉडर्न पेन्टॅथलॉन संघटनेचे संयुक्त सीईओसुद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी कांपाल येथील मैदानाच्या कामाची पाहणी केली. यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीनंतर ते म्हणाले की, सरकारकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत आश्वस्त केले जात आहे; परंतु या कामाचा वेग वाढवायला हवा. ही स्पर्धा राष्ट्रीय खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 
सध्या बºयाच संघटना सक्रिय आहेत. त्यांचे वार्षिक कॅलेंडर ठरलेले असतात. त्यातच २०१९ हे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत व्यस्त आहे. याच वर्षात २०२० मध्ये होणाºया आॅलिम्पिक पात्रता फेºया सुरू होतील. खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करीत आहेत. त्यापूर्वी, गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय क्रीडापटूंसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. ही स्पर्धा पुढे ढकलली गेली तर खेळाडूंच्या तयारीवर परिणाम होईल. काही आघाडीचे खेळाडू स्पर्धेला मुकतील. त्यांचे नुकसानही होईल. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात ज्या काही अडचणी येतील त्यावर मात करणे गरजेचे आहे, असेही शिरगावकर यांनी सांगितले. सध्या सुरु असलेल्या कामावर आम्ही समाधानी आहोत. पुढील महिन्यात भारतीय आॅलिम्पिक संघटनेची बैठक होईल. त्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा विषय प्रामुख्याने असेल, याकडे शिरगावकर यांनी लक्ष वेधले.

कांपाल मैदानावर होणार मॉडर्न पेन्टॅथलॉन
कांपाल येथे नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. या केंद्रावर मॉडर्न पेन्टॅथलॉन  प्रकारातील चार स्पर्धा होतील. त्यात जलतरण, धावण्याची शर्यत, तलवारबाजी आणि शुटींगचा समावेश आहे. शिरगावकर यांनी येथील कामाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारीसुद्धा होते. त्यांनी अधिकाºयांना कामाचा वेग वाढविण्याचा सल्ला दिला. प्रकल्पाच्या मूलभूत गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. इतर कामे उरली आहेत. तीसुद्धा वेळेवर पूर्ण होतील, अशी आशा शिरगावकर यांनी व्यक्त केली. शिरगावकर यांनी स्पर्धेचे संयुक्त सीईओ व्ही. एम. प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली. प्रभुदेसाई यांनी आपणाकडून सर्व प्रकारची तांत्रिक मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. नामदेव शिरगावकर हे आशियाई मॉडर्न पेन्टॅथलॉनचे महासचिवही आहेत. 

निवडणूकचा खेळाडू, स्पर्धेशी संबंधच नाही...
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी देशभर असेल. अशा स्थितीत स्पर्धेवर त्याचा परिणाम होऊ शकेल का? असे विचारले असता शिरगावकर म्हणाले की, निवडणूक आणि स्पर्धेचा काहीच संबंध नाही. केवळ राजकीय नेत्यांवर काही बंधने असतील. परंतु, राजकीय नेत्यांपेक्षा देशासाठी ही स्पर्धा महत्त्वाची आहे. निवडणुका जरी आल्या तरी त्याचा स्पर्धेवर काहीच परिणाम होणार नाही, असे मला वाटते. राजकारण्यांनी स्पर्धेचे श्रेय लाटू नये. त्यांनी स्पर्धा कशा होतील, याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सध्या आजारी आहेत. परंतु, त्यांनी ज्या पद्धतीने स्पर्धेची तयारी सुरू केली त्यावरून कुठल्याही स्थितीत स्पर्धा गोव्यातच होईल, असे जाणवते. त्यांची टीम दिवस-रात्र मेहनत घेत आहे. 

पेन्टॅथलॉनची‘इनिंग’ गोव्यातून...
आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेची ज्यांनी स्थापना केली त्या बॅरोनकुबर्टन यांनी या खेळाची सुरुवात केली. आता संपूर्ण जगभर हा खेळ लोकप्रिय झाला आहे. मॉडर्न पेन्टॅथलॉनचा समावेश पहिल्यांदाच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत होत आहे. गोव्यात या स्पर्धेची सुरुवात होत आहे, याचा आम्हाला आनंद आहे. या खेळात जलतरण, धावणे, शुटींग, घोडेस्वारी आणि धावण्याची शर्यत यांचा समावेश आहे. पेन्टॅथलॉनमध्ये आशियाई स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी रौप्यपदक पटकावले. जागतिक मानांकनातही महाराष्ट्राचे खेळाडू आघाडीवर आहेत.

Web Title: National competition should be timely; Otherwise the player's losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा