लिंगायत महामोर्चामुळे ‘लोकमत’ महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला! लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:53 IST2018-01-10T23:53:09+5:302018-01-10T23:53:13+5:30

लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणा-या राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणा-या लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.

Lingayat Mahamarti 'Lokmat' Mahamarethon on 18th February! Management decision to avoid inconvenience to people | लिंगायत महामोर्चामुळे ‘लोकमत’ महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला! लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय

लिंगायत महामोर्चामुळे ‘लोकमत’ महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला! लोकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्थापनाचा निर्णय

कोल्हापूर : लिंगायत समाजाच्या कोल्हापुरात २८ जानेवारीस काढण्यात येणाºया राज्यव्यापी महामोर्चाची दखल घेऊन त्याच दिवशी होणारी महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय ‘लोकमत’ व्यवस्थापनाने घेतला. मोर्चाला येणाºया लोकांची अडचण व गैरसोय होऊ नये, असा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आता ही महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीस होईल.
‘लोकमत’तर्फे आतापर्यंत नाशिक व औरंगाबादला महामॅरेथॉन झाली. नागपूरला ११ फेब्रुवारीस होणार आहे. तत्पूर्वी ही महामॅरेथॉन कोल्हापुरात २८ जानेवारीस सकाळी सहा वाजता होणार होती. ३, ५, १० व २१ किलोमीटर गटांत ही मॅरेथॉन होणार असून, त्याची जय्यत तयारीही पूर्ण झाली आहे. विजेत्यांना रोख बक्षिसासह पदक दिली जातील. ही मॅरेथॉन पोलीस परेड ग्राऊंडपासून सुरू होऊन कावळा नाका, विद्यापीठ, शाहू नाका व तेथून परत त्याचमार्गे पोलीस परेड ग्राऊंडवर समाप्त होणार होती.
दरम्यान, लिंगायत धर्माला संविधानिक ‘स्वतंत्र धर्म’ मान्यता मिळावी, अल्पसंख्याक दर्जा मिळावा व जनगणना अर्जात लिंगायत नोंदीसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे २८ जानेवारीलाच येथील दसरा चौकातून सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी मुख्यत: महाराष्ट्रातून व कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने लिंगायत बांधव येणार आहेत; परंतु महामॅरेथॉनसाठी सकाळी सहा वाजल्यापासून मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात येते. त्यामुळे लिंगायत बांधवांची गैरसोय टाळण्यासाठी मॅरेथॉन पुढे ढकलावी, अशी विनंती लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी ‘लोकमत’ व्यवस्थापनाकडे केली. त्या समाजाच्या भावनांची दखल घेऊन ‘लोकमत’ने महामॅरेथॉन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापुरातील महामॅरेथॉन १८ फेब्रुवारीला होणार असल्याने खेळाडूंना अधिक चांगल्या सोयी व पोषक वातावरण उपलब्ध होईल. महामोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेता गैरसोय टाळण्यासाठी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय धावपटूंच्या हिताचाच असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

‘लोकमत’ने जपली
सामाजिक बांधिलकी...
‘लोकमत’ने नेहमी सामाजिक बांधिलकी जपली असून समाजहितांच्या उपक्रमांना भरभरुन पाठिंबा दिला आहे. लिंगायत बांधवांच्या मोर्चाप्रती भावना लक्षात घेऊन ‘महामॅरेथॉन’चे आयोजन पुढे ढकलले. मोर्चात सहभागी होणाºया बांधवांचे हित जोपासल्याबद्दल ‘लोकमत’च्या पुढाकाराचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

Web Title: Lingayat Mahamarti 'Lokmat' Mahamarethon on 18th February! Management decision to avoid inconvenience to people