कशी असते महाराष्ट्र केसरी विजेत्याला देण्यात येणारी चांदीची गदा, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 06:36 PM2018-12-23T18:36:32+5:302018-12-23T18:37:55+5:30
पानगंटी घराण्याचे वारसदार अतुल पानगंटी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.
पुणे : प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी देण्यात येणारी मानाची गदा पानगंटी कुटुंबीयांकडून बनविण्यात येते. गेली 36 वर्षे शामराव पानगंटी यांनी ही गदा बनविली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अतुल पानगंटी यांनी ही परंपरा जपली आहे. दरवर्षी पानगंटी कुटुंबीयांकडून तयार केली जाणारी ही गदा मोहोळ कुटुंबीयांकडून महाराष्ट्र कुस्ती परिषदेकडे वाजत गाजत सुपुर्द केली जाते. माजी खासदार अशोक मोहोळ यांनी नुकतीच ही गदा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडे जालना येेथे सन्मानाने प्रदान केली.
'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते?
पेशव्यांनी 'पानगंटी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत.
यंदाची चांदीची गदा कशी आहे, पाहा हा खास व्हिडीओ...
आकार
उंची - 27 ते 30 इंच.
व्यास - 9 ते 10 इंच.
वजन - 10 ते 12 किलो
अंतर्गत धातू - सागवानी लाकडावर कोरीव काम आणि आकर्षक पिळे
बाह्य धातू - 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा. त्यावर कोरीव काम आणि झळाळी.
गदेचं बाह्यरुप - मध्यभागी मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवलेली असते. त्याच्या पलिकडच्या बाजूला हनुमानाचं चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवलेलं असतं.