मॅरेथॉनमध्ये धावले ७०० स्पर्धक, सामाजिक व स्वच्छतेचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 12:23 AM2019-01-23T00:23:37+5:302019-01-23T00:23:48+5:30

पालघर - ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त डहाणू येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

 700 marathon runners, social and clean message | मॅरेथॉनमध्ये धावले ७०० स्पर्धक, सामाजिक व स्वच्छतेचा संदेश

मॅरेथॉनमध्ये धावले ७०० स्पर्धक, सामाजिक व स्वच्छतेचा संदेश

Next

कासा : पालघर - ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ सहकारी पतपेढीच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त डहाणू येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन चमकदार कामिगरी बजावली. त्यामध्ये आदिवासी खेळाडू विद्यर्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले.
ही स्पर्धा १४ व १७ वर्षाखालील विद्यार्थी-विद्यार्थीनी अशा दोन गटात संपन्न झाली. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्र मगड, वसई, मोखाडा, पालघर, वाडा, जव्हार, तालुक्यातील सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘मुली वाचवा, मुली शिकवा’ हा सामाजिक संदेश आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ डहाणू, सुंदर डहाणू’ असा पर्यावरण रक्षणाचा संदेश स्पर्धकांनी दिला.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार द्वासे, पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे, संघटनेचे अध्यक्ष पी.टी. पाटील, उपाध्यक्ष जयंता पाटील, माजी अध्यक्ष अशोक पाटील, योगराज शिरसाट, प्रमोद पाटील, पतपेढीचे के. डी. पाटील, प्रगती पाटील, सुचित्रा पाटील, संजय पाटील, सुहास पारधी, राम पाटील, रखमा ढोणे, रवींद्र ठाकूर, विलास पाटील, वाल्मिक प्रधान तसेच पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पतपेढीचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक क्र ीडा शिक्षक उपस्थित होते. १४ वर्षाखालील गटात बालनंंदनवन शाळा जामशेत चा विद्यार्थी लहू वंसा पºहाड याने प्रथम तर दिलीप किसन भरभरे व विशाल रु पजी खराड यांनी अनुक्र मे द्वितीय आणि तृतीय क्र मांक मिळवला. याच गटातील मुलींच्या मॅरेथॉनमध्ये जीवन विकास हायस्कुल पालघरची विद्यार्थीनी मेहक मंगलदास वसावे हिने विजेतेपद मिळवले तर नंदिनी नरेश गोरखाना व दर्शना लखमा नावतरे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्र मांक पटकावला.
१७ वर्षाखालील मुलांच्या गटात राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू ओम फड (प्रथम), भोनू गोंड (द्वितीय) व अमित कोरडे (तृतीय) यांनी विजेतेपद पटकावले. हे तिन्ही खेळाडू एथलीट ग्रुप पालघरचे सदस्य आहेत. या गटात मुलींमध्ये विक्र मगड तालुक्यातील राज्य स्तरावरील खेळाडू श्रद्धा पारधी (प्रथम), निकिता बोरसा (द्वितीय) व ध्रुवीका पाटील (तृतीय) यांनी बाजी मारली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना झळालता चषक, प्रशिस्तपत्रक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक सेनेचे जिल्हा प्रमुख संजय पाटील, पतपेढी व संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी यांनी योगदान दिले.

Web Title:  700 marathon runners, social and clean message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.