तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दोन शिपाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 09:50 PM2018-05-03T21:50:07+5:302018-05-03T21:50:07+5:30

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून तळोजा मध्यवर्ती कारागृहातील लाच मागणाऱ्या २ शिपायांना ताब्यात घेतले तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

Two Policemen in the trap of the Anti Corruption Bureau | तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दोन शिपाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

तळोजा मध्यवर्ती कारागृहातील दोन शिपाई ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Next

पनवेल - ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून तळोजा मध्यवर्ती कारागृहातील लाच मागणाऱ्या २ शिपायांना ताब्यात घेतले तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. 1) सोमनिंग कटयापा कांबळे , (वय 27), कारागृह शिपाई, वर्ग 3, तळोजा कारागृह, तळोजा नवी मुंबई. रा.ओवेगाव ,तळोजा कारागृह समोर से. 35 ई खारघर नवी मुंबई.  2) महेश साहेबराव यादव, (वय 34) , कारागृह शिपाई वर्ग 3 तळोजा कारागृह तळोजा नवी मुंबई  अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
        आरोपींनी तक्रारदार यांच्याकडे  20000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांचे वडील सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांना कोठडीत कोणत्याही प्रकारे ञास न देण्यासाठी सदर लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील पहिला हप्ता स्वीकारला 5000 स्वीकारला होता व कोठडीत कोणत्याही प्रकारे ञास न देण्यासाठी दुसरा हप्ता वरील आरोपी सोमनिंग कटयापा कांबळे याने 15000 रु.ची मागणी केली होती तर आरोपी महेश साहेबराव यादव याने दुसरा हफ्ता ता. 02/05/2018 रोजी 6:35 वाजता. पंचासमक्ष स्वीकारली असता लाचलुचपत विभागाच्या ठाणे युनिटच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आहे. सध्या २ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत तर एक आरोपी अद्यापही फरार आहे.

Web Title: Two Policemen in the trap of the Anti Corruption Bureau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.