पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीचा ठराव मंजूर, पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पहिली महानगरपालिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 07:53 PM2017-12-18T19:53:17+5:302017-12-18T19:53:25+5:30

पनवेल महानगर पालिकेत दारूबंदीचा ठराव महासभेत सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे . पालिका क्षेत्रात दारुबंदी करणारी पनवेल महानगर पालिका ही राज्यातील पहिली महानगर पालिका ठरली आहे . 

Sanctioning of drinking liquor in the Panvel Corporation, the first municipal corporation to make liquor in the municipality area | पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीचा ठराव मंजूर, पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पहिली महानगरपालिका 

पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीचा ठराव मंजूर, पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पहिली महानगरपालिका 

googlenewsNext

पनवेल : पनवेल महानगर पालिकेत दारूबंदीचा ठराव महासभेत सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे . पालिका क्षेत्रात दारुबंदी करणारी पनवेल महानगर पालिका ही राज्यातील पहिली महानगर पालिका ठरली आहे . 
       यासंदर्भात पनवेल महानगर पालिकेच्या पहिल्या महासभेत दारूबंदीसंदर्भात चर्चा करण्यात आली होती . मात्र त्यांनंतर हा विषय पुन्हा सभागृहासमोर आला नव्हता. आज महासभेत या संदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पीठासीन अधिकारी महापौर डॉ . कविता चौतमोल यांना यासंदर्भात आठवन करून देत दारूबंदीच्या निर्णयाचे काय झाले ? असा प्रश्न विचारात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रवेशद्वार म्हणून पनवेल शहराची ओळख आहे . त्यामुळे दारूबंदीचा ठराव आणण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सत्ताधा-यांवर आरोप करीत सत्ताधारी यासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप केला. या ठरावावरून विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यात वयक्तिक शाब्दिक चकमक उडाली . विशेष म्हणजे कोण कोण दारू पितो अशाप्रकारची चर्चा सभागृहात रंगल्याने महापौर डॉ . कविता चौतमोल यांनी सदस्यांना सूचना देत कोणत्याही स्वरूपाची वयक्तिक टिप्पणी कोणावर करू नये . या सभेचे वृत्ताकन करण्यासाठी पत्रकार आले आहेत . त्यामुळे टीका करताना भान ठेवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला . 
      यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पालिका हद्दीत दारूबंदीचा ठराव मंजुरी साठी ठेवला . लगेचच सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून घेतला . अशाप्रकारे पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पनवेल महानगर पालिका हि राज्यातील पहिली महानगर पालिका असल्याचे यावेळी आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांनी सभागृहात सांगितले . 

Web Title: Sanctioning of drinking liquor in the Panvel Corporation, the first municipal corporation to make liquor in the municipality area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल