नियम पाळणा-या रिक्षा चालकांवर कारवाई न करण्याची मागणी, परंतु दोषींवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:27 AM2017-10-26T02:27:36+5:302017-10-26T02:27:53+5:30

पनवेल : रिक्षा चालकांना कायद्याचा बडगा दाखवत आरटीओ अधिका-यांकडून सातत्याने दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक दिली जात आहे.

Rickshaw drivers are not demanding action, but action will be taken against the culprits | नियम पाळणा-या रिक्षा चालकांवर कारवाई न करण्याची मागणी, परंतु दोषींवर कारवाई होणार

नियम पाळणा-या रिक्षा चालकांवर कारवाई न करण्याची मागणी, परंतु दोषींवर कारवाई होणार

googlenewsNext

पनवेल : रिक्षा चालकांना कायद्याचा बडगा दाखवत आरटीओ अधिका-यांकडून सातत्याने दुय्यम आणि अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कायद्याचे उल्लंघन करणाºया रिक्षा चालकांवर जरूर कारवाई करा, परंतु नियमांचे पालन करणाºया रिक्षा चालकांना त्रास देऊ नका,अशी मागणी पनवेलमधील संघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मणराव दराडे यांच्याकडे केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आरटीओ कार्यालयातून जाचक अटींचा मारा रिक्षा चालकांवर केला जात आहे. काही तगलादू गोष्टींकडे फार गांभीर्याने अधिकारी पाहत आहेत, तर बेकायदा रिक्षा चालकांना अभय देत असल्याची तक्रार संघर्ष रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने केली.
रिक्षा परमिट सरकारने आॅनलाइन करूनही त्यात मोठा आर्थिक घोळ झाला आहे. त्याची खातेनिहाय चौकशी व्हावी, अशी प्रमुख मागणी शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे करून त्यावर सविस्तर चर्चा केली. रिक्षासाठी लागणारे रेडियमचे पट्टे किरकोळ किमतीत उपलब्ध असताना त्यासाठी सातशे रुपये मोजण्याची सक्ती रद्द करण्यात यावी, वन टाइम टॅक्स, नूतनीकरण, ग्राहकांची नावे आणि इतर रिक्षांचे भाडे दर निश्चित करणे त्याशिवाय काही ठिकाणी वाहतूक पोलिसांची मदत घेवून शहरातील काही नाक्यांवर होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी आरटीओ अधिकाºयांनी समन्वयाची भूमिका बजावावी, अशा विविध मागण्या यावेळी संघटनेकडून करण्यात आल्या.
यावेळी शिष्टमंडळात संघटनेचे बाळाराम पाटील, राजेश पाटील, मंगल भारवाड, मनोहर देसाई, विलास तांबोळी, घनश्याम धुमाळ, पंकज वारदे, शंकर गुंजाळ, आत्मा जाधव, संतोष रायकर, राजेश निमळेकर, सुनील गोरे, रजाक सत्ताक शेख, अरुण जोशी, साजुद्दिन कोतवाल, दिलीप देशमुख, रावसाहेब जोगदंड, नासीर शेख, दीपक पाटील, बाळू थोरात, भालचंद्र तांबोळी, बाळकृष्ण पाटील, सागर तवटे, प्रकाश शेलार, महेंद्र पवार, रत्नाकर खंडागळे, संतोष शेलार, भगवान पाटील, शशिकांत भगत, विजय पाटील, श्याम भगत आदींचा समावेश होता.

प्रादेशिक कार्यालयाच्या पारदर्शक कारभारासाठी आॅनलाइन परमिट सोडण्यात आलेले आहेत. त्यांची सरकारी नियमांप्रमाणेच फी घेऊन त्याची पावती दिली जाते. संघर्ष रिक्षा चालक, मालक संघटनेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन याबाबतीत काही गैरव्यवहार झाला असेल, त्याची खातेनिहाय चौकशी केली जाईल, कुणालाही अभय देण्याचा प्रश्नच नाही. दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच रिक्षा चालक, प्रवासी यांच्यात समन्वय साधण्याची भूमिका नेहमी बजावत आहोत. कोणत्याही रिक्षा चालकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही असे पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मणराव दराडे यांनी स्पष्ट केले आहे.
>चालकांना नेहमीच सहकार्य
रिक्षा चालकांना जाचक वाटणाºया अटी आणि शर्थी काही अंशी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. रेडियमच्या पट्ट्याचा मुद्दा आणि इतर काही नियम रद्दबातल ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांवर मनमानीपणे कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही कंपन्यांचे रिक्षाचे सुटे भाग सहज उपलब्ध होत नाहीत, याची कल्पना आहे. परंंतु, तो मुद्दा गौण आहे. सरकारच्या नियमांनुसार रिक्षा चालकांना सहकार्याच्या भावनेतून वागणूक दिली जात असल्याचे पनवेलचे उपप्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी सांगितले.

Web Title: Rickshaw drivers are not demanding action, but action will be taken against the culprits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.