The prisoners of Taloja jails got their eyes closed | तळोजा कारागृहातील कैद्यांचे डोळे पाणावले

पनवेल : विविध गुन्ह्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अनेक दिवसांपासून आपल्या मुलांपासून दूर राहावे लागते. एकांतात शिक्षा भोगत असताना कुटुंबीयांपासून दूर राहावे लागते. प्रत्येक कैद्यांना आपल्या कुटुंबीयांना भेटायची इच्छा असते. त्यांची हीच इच्छा तळोजा कारागृहातील अधीक्षक सदानंद गायकवाड यांच्या पुढाकाराने गुरु वारी पूर्ण झाली. गळाभेट या उपक्रमाअंतर्गत निवडलेल्या ११ कैद्यांना आपल्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून देण्यात आली.
तळोजा कारागृह हे महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यानंतर बांधलेले पहिले कारागृह आहे. २१२४ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सध्याच्या घडीला २५०० पेक्षा जास्त कैदी आहेत. विशेष म्हणजे कुख्यात गुंड डी.के.राव, अबू सालेम यांच्यासह भरत नेपाळी गँग, शरद मोहळ गँग, इंडियन मुजाहिद्दीन, मालेगाव बॉम्बस्फोट, छोटा राजन गँग, सिमीसह १९९३ बॉम्बस्फोटामधील आरोपी या कारागृहात आहेत. अनेक वेळा कैद्यांमधील भांडणाने चर्चेत येणारे तळोजा कारागृह आज कैद्यांची गळाभेट या अनोख्या कार्यक्र माच्या माध्यमातून चर्चेत आले. निवडक कैद्यांच्या कुटुंबीयाकरिता छोटेखानी कार्यक्र माचे आयोजन करून मुलांसोबत संवाद घडवून आणला. यावेळी कैदी आणि त्यांच्या मुलांच्या चेहºयावरून आनंद द्विगुणित झाल्याचे पहावयास मिळाले.

कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी एखादा आरोपी शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना देखील त्याची चिंता लागून राहिलेली असते. विशेषत: लहान मुलांवर याचे परिणाम होत असतात. या कार्यक्र माच्या आयोजनामागे कैदी व त्यांच्या मुलांचा संवाद हेच होते. कारागृहात काम करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते अमर सावंत व संदीप दिघे यांच्या संकल्पनेतून हा उपक्र म राबविण्यात आला.लक्ष्मण पवार या कैद्याने आपल्या भावना व्यक्त करताना खरोखरच आजचा दिवस मला एखाद्या सणासारखा वाटतोय. राजेश पवार (६), नीलम पवार (४) या माझ्या मुलांना भेटून मला खूप आनंद झाला. अशाच प्रकारे अनिल पटेल (४७) हा कैदी याठिकाणी होता.