पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:25 AM2017-12-09T02:25:39+5:302017-12-09T02:25:50+5:30

पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या गर्तेत सापडले असल्याचे दिसत आहे. पहिल्या व दुसºया मजल्यावर चढताना भिंतीवर पानाच्या पिचका-या उडालेल्या दिसत आहेत.

Panvel tehsil office issues | पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या विळख्यात

पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या विळख्यात

googlenewsNext

मयूर तांबडे
पनवेल : पनवेल तहसील कार्यालय समस्यांच्या गर्तेत सापडले असल्याचे दिसत आहे. पहिल्या व दुसºया मजल्यावर चढताना भिंतीवर पानाच्या पिचका-या उडालेल्या दिसत आहेत. तर दुस-या मजल्यावरील शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पनवेल शहरातील साईनगर येथील तहसील कार्यालय विविध समस्यांनी ग्रस्त आहे. त्यामुळे येथे येणाºया नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पनवेल येथील तहसील कार्यालयाची इमारत चार ते पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आली. पनवेल तहसील कार्यालय नेहमीच गजबजलेले असते. विविध प्रकारचे दाखले तसेच शासकीय कामे करण्यासाठी दररोज शेकडो नागरिक व विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक ये-जा करत असतात. जिन्याच्या जवळ कचरा साचलेला आहे. बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. महत्त्वाची कागदपत्रे असलेले कपाट उघड्या स्थितीत आहे. तर शासकीय कामांसाठी महत्त्वाची असलेली व सील करण्यासाठी आवश्यक असलेली लाखदेखील उघड्या अवस्थेत दुसºया मजल्यावर आहे.
तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती होण्यासाठी फलक छापलेले आहेत. मात्र, कित्येक दिवसांपासून हे फलक दुसºया माळ्यावर धूळखात पडून आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, आम आदमी विद्यार्थी शिष्यवृत्ती या योजना संजय गांधी शाखेमार्फत राबविल्या जातात. मात्र, फलक लावलेले नसल्याने योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती होत नाही, त्यामुळे कागदपत्रे जमा होईपर्यंत नागरिकांना हेलपाटा घालावा लागत असल्याची खंत विजय पाटील यांनी व्यक्त केली.
तहसील कार्यालयाच्या टेरेसवरील पत्रे फुटले असून, ते जिन्यावर खाली पडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर बाजूलाच असलेल्या शौचालयाची अवस्था दयनीय आहे. काही वेळेला शौचालयात पाणी नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
शौचालयाच्या काचेच्या खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर फ्लश टँक तुटलेले आहे. या साºया समस्यांतून सुटका व्हावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Web Title: Panvel tehsil office issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल