विकास निधीस कळंबोली स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:31 AM2018-12-29T03:31:10+5:302018-12-29T03:31:28+5:30

लोह-पोलाद बाजाराच्या आवारात नेमकी काय काय कामे केली, कुठे निधी खर्च केला याचा पहिला लेखाजोखा मांडा आणि मगच विकास निधी मागा, अशा शब्दात व्यापाºयांनी बाजार समितीला सुनावले.

Opposition to traders in the development fund of Kalamboli Steel Market | विकास निधीस कळंबोली स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांचा विरोध

विकास निधीस कळंबोली स्टील मार्केटमधील व्यापाऱ्यांचा विरोध

googlenewsNext

कळंबोली : लोह-पोलाद बाजाराच्या आवारात नेमकी काय काय कामे केली, कुठे निधी खर्च केला याचा पहिला लेखाजोखा मांडा आणि मगच विकास निधी मागा, अशा शब्दात व्यापाºयांनी बाजार समितीला सुनावले. त्याचबरोबर आॅफिस प्रीमायसेसवाल्यांनीही व्यापाºयांच्या रीत री ओढत याबाबत विचारणा केली.
स्टील मार्केटमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. बगिचासाठी राखीव असलेल्या जागेवर अतिक्र मण करून या ठिकाणी गॅरेज शिवाय इतर दुकाने थाटण्यात आली आहेत. एवढेच काय तर कुर्ल्यातील भंगारवाल्यांनीही कळंबोलीतील लोखंड बाजारात आपले बस्तान बांधले आहे. त्यामुळे लोखंड की भंगार बाजार, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
स्टील मार्केटमध्ये सिडकोने पेरीफेरी रोड तयार केला. मात्र, त्याच्या दोनही बाजूने वाहने उभी केली जातात. अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बंद पडलेल्या गाड्या उभ्या दिसतात. त्यांचे मालक त्या उचलून नेत नाहीत. त्याचबरोबर काही वाहने बेवारस आहेत. यामुळे रस्त्यांना भंगाराचे स्वरूप तर प्राप्त झाले आहेच.
अंतर्गत रस्ते तयार करण्याकरिता बाजार समितीने अतिरिक्त निधी जमा करण्याकरिता व्यापारी तसेच बिमा, डिस्मा आणि स्टील चेंबर या आॅफिस प्रीमायसेस सोसायट्यांना नोटिसा बजावल्या. या संदर्भात माहिती देण्याकरिता मागील आठवड्यात स्टील चेंबरमध्ये मिटिंग बोलविण्यात आली होती.
आम्ही विकास निधी देऊ; मात्र पेरीफेरी रोडवरील गाड्या कोण हटवणार, टोलमधून किती उत्पन्न मिळते ते कुठे खर्च केले जाते, असा प्रश्न बिमा संकुलचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी उपस्थित केला.
नेमका टोल कुठपासून कुठपर्यंत आहे, याची माहिती पहिली द्या, पथदिव्यांची व्यवस्था का नाही, शासनाकडून निधी आणण्याकरिता कोणते प्रयत्न झाले, हा विषयही मांडण्यात आला. अंतर्गत भागातील पायाभूत सुविधा काय? या ठिकाणचे अतिक्र मण कोण काढणार? आदी विविध प्रश्नांचा बैठकीत मारा करण्यात आला.

मार्केट कमिटी आमच्याकडून फक्त कर घेते, पायाभूत सुविधा फक्त कागदावरच आहेत. पूर्वी मार्केटमध्ये बस येत होती आता ती येत नाही, याला जबाबदार कोण? आतमध्ये विजेचा पत्ता नाही, आता कुठे तरी दोन-तीन स्वच्छतागृह बांधली आहेत. याचा विचार होण्याची गरज आहे.
- दीपक निकम,
संचालक, स्टील चेंबर

आतमधील रस्ते तसेच इतर विकासकामांकरिता आम्ही अतिरिक्त निधी जमा करीत आहोत. त्या दृष्टिकोनातून नोटिसाही देण्यात आलेल्या आहेत. ज्या भागातून निधी अगोदर येईल, त्या ठिकाणचा कायापालट करण्यात येईल.
- विकास रसाळ,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
स्टील मार्केट कमिटी

Web Title: Opposition to traders in the development fund of Kalamboli Steel Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.