आठवडे बाजारांकडे महापालिकेची पाठ, गुन्हेगारांचे ‘अर्थ’कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:56 AM2017-12-04T00:56:58+5:302017-12-04T00:56:58+5:30

नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

The Municipal Corporation's reading of the weeks, the reason for the criminals 'meaning' cause | आठवडे बाजारांकडे महापालिकेची पाठ, गुन्हेगारांचे ‘अर्थ’कारण

आठवडे बाजारांकडे महापालिकेची पाठ, गुन्हेगारांचे ‘अर्थ’कारण

Next

नवी मुंबई : नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होऊनही शहरातील आठवडे बाजारांकडे महापालिका कारवाईला दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने फेरीवाल्यांकडून रहदारीचे प्रमुख रस्ते, तसेच खेळाची मैदाने व्यापली जात आहेत. मात्र, अशा आठवडे बाजारांमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडले असून, गुन्हेगारीवाढीलाही ते कारणीभूत ठरत आहेत.
शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भरणारे आठवडे बाजार नागरिकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. ग्रामीण भागातील गरजेची आठवडे बाजाराची ही पद्धत शहरी भागात केवळ अर्थकारणासाठी वापरली जात आहे. ग्रामीण भागात आठवड्यातून एका दिवशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, याकरिता आठवडे बाजार भरवले जातात. त्या ठिकाणी शेतीच्या आवश्यक साधनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू, भाजेपाल्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. मात्र, शहरी भागात मोठ्या प्रमाणात दुकाने, बाजारपेठा उपलब्ध असल्याने दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या गरजा कोणीही सहज भागवू शकतो. त्याकरिता आठवडे बाजाराची आवश्यकता नसतानाही, केवळ काही व्यक्तींच्या पुढाकारातून ते भरवले जात आहेत. त्याकरिता गाव-गावठाणांतील रस्ते, खेळाची मैदाने या ठिकाणी फेरीवाले बसवले जात आहेत. यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० ते १००० रुपये भाडे संबंधित व्यक्तीकडून आकारले जात असल्याचेही समजते. तर बाजारात अधिकाधिक फेरीवाले बसावेत, याकरिता शहराबाहेरून फेरीवाल्यांना निमंत्रित केले जात आहे. त्यामुळे आठवडे बाजाराच्या निमित्ताने गुन्हगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीही शहरात फेरफटका मारत आहेत.
काही दिवसांपूर्वी मच्छीविक्रेते बनून आलेल्या टोळीने सानपाडा येथे एकाच रात्रीत सात घरफोड्या केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत; परंतु ज्याच्या घरासमोर बाजार भरवला जातो, त्यांनाही संबंधितांकडून रसद पुरवली जात असल्याचे बोलले जात आहे; परंतु संपूर्ण प्रकाराचा नाहक त्रास इतर नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अशा वेळी वादाचे प्रकार घडत असून, त्याचे पडसाद हाणामारीतही उमटत आहेत.

Web Title: The Municipal Corporation's reading of the weeks, the reason for the criminals 'meaning' cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.