मराठा क्रांती मोर्चा : युवा नेतृत्वाची नियोजनबद्ध आखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 06:27 AM2017-08-10T06:27:53+5:302017-08-10T06:27:53+5:30

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महामोर्चासाठी नवी मुंबई, पनवेल परिसरात ठिकठिकाणी स्वयंसेवक कार्यरत होते. यामध्ये तरुण स्वयंसेवकांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्ध आखणी, नेतृत्वगुण, एकजुटीचे दर्शन घडले.

Maratha Kranti Morcha: Planning for Young Leadership | मराठा क्रांती मोर्चा : युवा नेतृत्वाची नियोजनबद्ध आखणी

मराठा क्रांती मोर्चा : युवा नेतृत्वाची नियोजनबद्ध आखणी

Next

प्राची सोनवणे 
नवी मुंबई : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महामोर्चासाठी नवी मुंबई, पनवेल परिसरात ठिकठिकाणी स्वयंसेवक कार्यरत होते. यामध्ये तरुण स्वयंसेवकांमधील स्वयंशिस्त, नियोजनबद्ध आखणी, नेतृत्वगुण, एकजुटीचे दर्शन घडले. रेल्वे स्थानक, उड्डाणपूल, महत्त्वाचे चौक, बस स्थानके आदी परिसरात स्वयंसेवकांनी विविध भूमिका बजाविल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विविध जिल्ह्यातून येणाºया मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये, तसेच मोर्चामध्ये नवी मुंबई, पनवेल परिसरातून सहभागी होणाºया बांधवांना कसल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत होते. मोर्चातील सहभागी बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मराठा मेडिको असोसिएशन, महानगरपालिका, डॉक्टर्स यांच्या वतीने रुग्णवाहिका सुविधा पुरविण्यात आल्या. मुंबईबाहेरून येणाºया नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी रेल मराठा स्वयंसेवक कार्यरत होते. काळ््या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेल्या या स्वयंसेवकांनी लोकल प्रवास सुरळीत व्हावा याकरिता विशेष खबरदारी घेतली होती.
शिक्षणासाठी आरक्षण नसल्याने मोठी कसरत करावी लागत असल्याची प्रतिक्रिया तरुणवर्गाकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळविताना आलेल्या अडचणींविषयी खंत व्यक्त करताना विद्यार्थिनी प्रियंका धुरी हिने नाराजी व्यक्त केली.
परिस्थिती जेमतेम असतानाही फीमध्ये सवलत दिली जात नाही तर आरक्षित विद्यार्थ्यांना मात्र दुपटीने फीमध्ये सवलत मिळत असल्याने एक प्रकारे अन्याय होत असल्याचे प्रतिपादन धुरी हिने केले. सध्या नोकरी करत असलेल्या वैभव महानगरे आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
सरकारी नोकरीमध्ये आरक्षित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते तर आरक्षणाअभावी चांगले गुण मिळूनही हवी ती नोकरी करता येत नसल्याचे वैभवने स्पष्ट केले.

महामार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता नवी मुंबई पोलिसांनी पनवेल परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यातून मराठा समाजातील लोक मोर्चाकरिता बुधवारी मुंबईत आले होते. यात चारचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक होती. नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासूनच वाहतूक नियमनाकरिता पोलीस तैनात होते. पनवेल आणि कळंबोली वाहतूक शाखेकडून प्रभारी अधिकारी विजय कादबाने आणि गोरख पाटील यांच्यासह चार अधिकारी आणि १०६ कर्मचारी चोवीस तास महामार्गावर तैनात करण्यात आले होते. शेडुंग टोल नाका ते खारघर दरम्यान फौजफाटा सज्ज होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीला मुख्यालय आणि इतर साईट ब्रँचची कुमक पाठविण्यात आली होती. दिशादर्शक आणि माहिती फलक लावले होते.

सरकारी नोकºया, शिक्षण क्षेत्रात मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. शासनाच्या वतीने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून न्याय दिला पाहिजे अशीच मागणी आहे.
- आशिष बाबर

हा ५८वा मोर्चा असून अजूनही शासनाला जाग आली नाही याची खंत वाटते. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. महिलांची सुरक्षा वाढवून कठोर कायदे लागू झाले पाहिजे. मोर्चातून एकजुटीचे दर्शन सरकारला नमते करेल.
- साधना पवार

इतर जातींप्रमाणेच मराठ्यांना देखील प्रत्येक क्षेत्रात आरक्षण मिळालेच पाहिजे आणि यासाठी आज नवी मुंबई, पनवेल परिसरातील मराठा बांधवांकडून मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला आहे.
- शंकर वासमाने

सरकारचे डोळे उघडण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून नवी मुंबई, पनवेलमध्ये स्वयंसेवक कार्यरत आहेत. वाहतूक व्यवस्था, पोलिसांवर ताण येऊ नये यासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत. - अर्जुन घाटगे

मोर्चानंतर होणारा निर्णय हा सार्थकी लागावा असा हवा. तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या, अशीच आमची मागणी आहे. आतापर्यंतचे निर्णय दुटप्पी होते; मात्र ठोस निर्णयाची गरज आहे.
- शशिकांत शेडगे

मोफत प्रवास
मोर्चात सहभागी होणाºया नागरिकांसाठी, मराठा बांधवांसाठी मोफत रिक्षा प्रवासाची सोय करण्यात आली होती. रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना या रिक्षाचा आधार घेता आला. खारघरमधील आकाश चंद्रकांत पाटील या तरुणाने हा उपक्रम राबविला होता. या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेल्या नागरिकांनाही या उपक्रमाचा लाभ घेता आला.

Web Title: Maratha Kranti Morcha: Planning for Young Leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.