पनवेल तालुक्यात पाच ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू;उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नाही 

By वैभव गायकर | Published: April 19, 2024 03:30 PM2024-04-19T15:30:54+5:302024-04-19T15:31:58+5:30

रणरणत्या उन्हात पनवेल तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे.

in panvel heat stroke rooms are open at five places there is no record of heat stroke patients | पनवेल तालुक्यात पाच ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू;उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नाही 

पनवेल तालुक्यात पाच ठिकाणी उष्माघात कक्ष सुरू;उष्माघाताच्या रुग्णाची नोंद नाही 

पनवेल : रणरणत्या उन्हात पनवेल तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला आहे. उष्माघातामुळे लोकांना त्रास होऊ नये यासाठी पनवेल तालुका आरोग्य विभागाने पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन केला आहे.चोवीस उपकेंद्रावर जनजागृती करण्यात येत आहे.

तापमानाचा पारा वाढू लागल्याने जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. उष्माघातामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. तालुक्यात उष्माघातामुळे जीवित हानी झाली नसली तरी नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. तालुका आरोग्य विभागाच्या माध्यमातून आजीवली,आपटा,वावंजे,नेरे,गव्हाणच्या अधिपत्याखाली असणाऱ्या चोवीस ऊपकेंद्रा मार्फत जनजागृती करण्यात येत आहे. आरोग्य केंद्रात ऊष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. 

प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता केली जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते यांनी दिली.उष्माघातापासून खबरदारी म्हणून तालुका आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारीच्या उपायोजना केल्या जात आहेत.

शेतमजूर, शेतकरी, बांधकाम कामगार फेरीवाले हात गाडीवाले कडक उन्हात उपजीविकेसाठी राबतात. त्यांना उष्मघाताचा  सर्वाधिक त्रास सहन करावा लागत खेडेगावात, आदिवासी पाड्यात, डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. या लोकांसाठी पनवेल तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहे.तापमानातील बदलामुळे नागरिकांनी डीहायड्रेशन पासून वाचण्यासाठी  लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.  उन्हात बाहेर जाताना गॉगल, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आलाआहे.

उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता नागरिकांनी सतर्कताबाळगावी.उष्माघातासंदर्भात अद्याप तरी पनवेल मध्ये रुग्णांची नोंद करण्यात आलेली नाही.- डॉ. सुनील नखाते(तालुका आरोग्य अधिकारी,पनवेल)

Web Title: in panvel heat stroke rooms are open at five places there is no record of heat stroke patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.