महानगरपालिकेच्या कचराकुंड्या भंगार विक्रेत्यांनी चोरल्या; पोलिसात तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 03:57 PM2019-04-14T15:57:53+5:302019-04-14T15:58:39+5:30

दि.11 रोजी सफाई  मुकादम योगेश केणी यांना यासंदर्भात तळोजा फेजमधून एका रहिवाशाने पालिकेचे सुखा व ओला कचरा वर्गीकरण करणारे डब्बे येथील भंगारवाल्याजवळ असल्याची माहिती दिली.

The garbage scam dealers of the municipal corporation stole; The police file a complaint | महानगरपालिकेच्या कचराकुंड्या भंगार विक्रेत्यांनी चोरल्या; पोलिसात तक्रार दाखल 

महानगरपालिकेच्या कचराकुंड्या भंगार विक्रेत्यांनी चोरल्या; पोलिसात तक्रार दाखल 

Next

पनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील तळोजा फेज 1 याठिकाणी पालिकेने बसविलेल्या कचरा कुंड्या येथील भंगार विक्रेत्यांनी चोरल्याची घटना समोर आली आहे .तळोजा  येथील महम्मद सलीम नूर शेख (38) असे या भंगार विक्रेत्याचे नाव आहे .खारघर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दि .11 रोजी सफाई  मुकादम योगेश केणी  यांना यासंदर्भात  तळोजा  फेज  मधून एका रहिवाशाने  पालिकेचे सुखा  व ओला कचरा वर्गीकरण करणारे डब्बे येथील  भंगार वाल्याजवळ असल्याची माहिती दिली .यासंदर्भात पालिका अधिकारी भगवान पाटील व सफाई मुकादम यांनी भंगार वाल्याला गाठल्यावर त्याठिकाणी तीन डब्बे आढळले .संबंधित भंगार विक्रेत्यांवर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भंगार विक्रेत्याचा समावेश आहे .सर्व अनधिकृत भंगारविक्रेते आहेत . विशेष म्हणजे हे  अनधिकृत भंगारवाले पालिकेच्याच मुलावर उठत असल्याचे या प्रकारामुळे सिद्ध झाले आहे.

Web Title: The garbage scam dealers of the municipal corporation stole; The police file a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.