निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक, ओळखीतून गुंतवलेले पैसे केले हडप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 11:18 PM2019-04-14T23:18:31+5:302019-04-14T23:18:41+5:30

ओळखीच्या बहाण्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.

The fraud made by the retired judges, the money invested was made | निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक, ओळखीतून गुंतवलेले पैसे केले हडप

निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक, ओळखीतून गुंतवलेले पैसे केले हडप

Next

नवी मुंबई : ओळखीच्या बहाण्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ऐरोलीत राहणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.
ऐरोली सेक्टर ७ येथे राहणारे निवृत्त न्यायाधीश बी. एल. वाघमारे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. नांदेड येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर मागील काही वर्षांपासून ऐरोलीत सहकुटुंब स्थायिक आहेत. या दरम्यान ते नियमित सकाळ, संध्याकाळ परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असत, त्याच वेळी दोन व्यक्ती व एका महिलेने त्यांच्यासोबत ओळख वाढवली. यानंतर ते तिघेही त्यांना सातत्याने फोन करून निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाच्या गुंतवणुकीबाबत विचारत. तसेच त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास पाच वर्षांत दुप्पट रक्कम देऊ, असे आमिषही दाखवायचे.अखेर वाघमारे यांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. याचा पुरावा म्हणून त्यांना एक-एक लाखाची दोन प्रमाणपत्रे देण्यात आली होती. काही महिन्यांतच तिघांनीही संपर्क कमी केल्याने वाघमारे यांनी चौकशी केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली.
>पोलिसांकडून चालढकल होत असल्याचा आरोप
वाघमारे यांनी खातरजमा केली असता, गुंतवणुकीची प्रमाणपत्रे बनावट असून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता, संबंधितांकडून त्यांना धमक्या देण्यात आल्याने त्यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार केली. बाळासाहेब जगताप, प्रज्ञा जगताप व बिजाम या तिघांविरोधात वाघमारे यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांकडून कारवाईत चालढकल होत असल्याचा आरोप निवृत्त न्यायाधीश बी. एल. वाघमारे यांनी केला आहे.

Web Title: The fraud made by the retired judges, the money invested was made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.