वृद्ध महिलेने मानले पोलिसांचे आभार, दागिने चोर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 03:31 AM2019-02-09T03:31:13+5:302019-02-09T03:32:57+5:30

कर्जत शहरात राहणाऱ्या ७५ वर्षीय मालती मधुकर पंडित यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेला होता.

An elderly woman convicted the police, held the jewelry thief | वृद्ध महिलेने मानले पोलिसांचे आभार, दागिने चोर अटकेत

वृद्ध महिलेने मानले पोलिसांचे आभार, दागिने चोर अटकेत

Next

कर्जत - कर्जत शहरात राहणाऱ्या ७५ वर्षीय मालती मधुकर पंडित यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेला होता. त्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याने पंडित यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.

कर्जतमध्ये राहणा-या ७५ वर्षीय मालती मधुकर पंडित यांच्या मुलाचे निधन झाल्यानंतर त्या मुलाच्या सुपर फोटो स्टुडिओमध्ये बसतात. १४ आॅगस्ट २०१८ रोजी स्टुडिओ बंद करून घरी जात असताना रात्री ८.३०च्या सुमारास नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या काही अंतरावर मोटारसायकलवरून दोन तरुणांनी त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ घेऊन पळ काढला.

याबाबत पंडित यांनी कर्जत पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप, पोलीस नाईक रोहित मोरे यांनी कर्जत हद्दीतील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते. चेन खेचण्याच्या घटना सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत होत होत्या. पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी याअगोदर कर्जत पोलीस ठाण्यात काम केले होते.

चेन खेचणारी टोळी येथील नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तपासात या टोळीच्या मागावर पोलीस कर्नाटक, गोवा या ठिकाणी जाऊन आले. अखेर पोलीस ज्यांच्या मागावर होते त्यांना कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ममदापूर येथे पकडण्यात यश आले.
मूळची कर्नाटकमध्ये राहणारी टोळी असून रायगड जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन खेचण्याच्या घटना करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

Web Title: An elderly woman convicted the police, held the jewelry thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.