शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका, मनसेची कोकण आयुक्तांकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 12:37 PM2017-10-16T12:37:07+5:302017-10-16T12:42:35+5:30

मुंबई महानगर पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण भवनात जाऊन आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांची भेट घेतली.

Do not let a separate group of six corporators who have gone to Shivsena, MNS's Konkan Commissioner | शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका, मनसेची कोकण आयुक्तांकडे धाव

शिवसेनेत गेलेल्या सहाही नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करू देऊ नका, मनसेची कोकण आयुक्तांकडे धाव

Next

नवी मुंबई - मुंबई महानगर पालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यांनी कोकण भवनात जाऊन आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांची भेट घेतली. मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत दाखल झालेल्या सहा नगरसेवकांना स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी मनसेच्या नेत्यांनी केली आहे. अशा आशयाचे निवदेन त्यांनी कोकण आयुक्त सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांना दिले आहे. दरम्यान, कोकण आयुक्त सुट्टीवर असल्याने मनसे नेत्यांची भेट झाली नाही, अशी माहिती समोर आली आहे.  

Web Title: Do not let a separate group of six corporators who have gone to Shivsena, MNS's Konkan Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.