नाट्यनिर्मात्याला नाकारली व्हीआयपी रूम, कर्मचा-यांची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 02:39 AM2017-09-19T02:39:46+5:302017-09-19T02:39:48+5:30

महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी व लाखो प्रेक्षकांना करमणुकीचे दालन उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल शहरात आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत या नाट्यगृहात शेकडो नाटके झाली.

Defeat of the VIP room, the boss of the employee denied | नाट्यनिर्मात्याला नाकारली व्हीआयपी रूम, कर्मचा-यांची अरेरावी

नाट्यनिर्मात्याला नाकारली व्हीआयपी रूम, कर्मचा-यांची अरेरावी

googlenewsNext

मयूर तांबडे 
पनवेल : महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी व लाखो प्रेक्षकांना करमणुकीचे दालन उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल शहरात आद्य
क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत या नाट्यगृहात शेकडो नाटके झाली. मात्र यावेळी वाईट अनुभव येत असल्याचा आरोप सिनेकलाकार, प्रेक्षक तसेच निर्मात्यांकडून होत आहे. याठिकाणी आयोजित नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी एका निर्मात्याला नाट्यगृहातील व्हीआयपी रूम नाकारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामुळे नाट्यनिर्माते व नाट्यरसिक नाराज झाले आहेत.
पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाचे उद्घाटन १ जून २0१४ रोजी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. फडके नाट्यगृहामुळे महापालिकेला महिन्याला लाखो रु पयांचा तोटा होत असल्याचे समोर आले आहे. फडके नाट्यगृहात पार्किंगची समस्या भेडसावत आहे. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात प्रेक्षकांच्या क्षमतेपेक्षा वाहनतळाची जागा अपुरी आहे. त्यामुळे नाट्यगृहात असलेले भूमिगत पार्किंग सुरू करण्याची मागणी होत आहे. गेल्या तीन वर्षात फडके नाट्यगृहात शेकडो नाटके, स्नेहसंमेलने, राजकीय कार्यक्र म घेण्यात आले. कधी सुरक्षेच्या कारणावरून तर कधी असुविधांमुळे नाट्यगृहाची चर्चा होतच राहिली आहे. १७ सप्टेंबर रोजी फडके नाट्यगृहात स्टॅचू आॅफ लिबर्टी या नाटकाचा शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी नाट्य निर्माते राहुल भंडारे यांनी येथील कर्मचाºयाकडे व्हीआयपी रूमची मागणी केली. मात्र या कर्मचाºयाने त्यांना व्हीआयपी रूम देण्यास नकार दिला. याच नाट्यगृहात ज्येष्ठ निर्माते, कलावंत यांना १०ते १५ मिनिटे व्हीआयपी रूम वापरण्यास देत होते. मात्र भंडारे यांच्या म्हणण्यानुसार येथील कर्मचाºयाने त्यांना व्हीआयपी रूम न दिल्याने आलेले ज्येष्ठ साहित्यिक, कलाकार नाराज झाले. त्यामुळे येथील कलाकारांच्या सुरक्षेला कोण जबाबदार राहील असा सवाल त्यांनी केला आहे. येथील कलाकारांची चेंजिंग रूम देखील छोटी आहे. कलाकारांना व्हीआयपी रूम नाकारली जाते. व्हीआयपी रूमचे अतिरिक्त पैसे हवे असतील तर पैसे घ्या असे सांगून देखील व्हीआयपी रूम नाकारल्याचे भंडारी यांनी सांगितले. कलावंतांना व्हीआयपी रूम देण्यास नकार देत असतील तर नाटक करण्यास निर्माते नकार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
>फडके नाट्यगृहात ३ तासांच्या नाटकासाठी १२ हजार रु पयांचे भाडे भरले होते. व्हीआयपी रूमचा अतिरिक्त चार्ज भरण्यासही तयार होतो. दोन महिन्यांपूर्वी ९ जुलै रोजी प्रयोग सुरू होण्याच्या आधी एका रसिकाने नाटक बंद करा, अन्यथा बॉंम्बस्फोट होऊ शकतो अशी धमकी दिली होती. त्यामुळे नाट्यगृहात येणाºया कलावंतांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
- राहुल भंडारे, निर्माते
>निर्मात्याने माझ्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क साधलेला नाही. सध्या व्हीआयपी रूमचे भाडे २ हजार रु पये आकारण्यात येत आहे.
- अरु ण कोळी,
व्यवस्थापकीय अधिकारी,
वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह

Web Title: Defeat of the VIP room, the boss of the employee denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.