पनवेलमध्ये बेकायदा आठवडी बाजार; कोट्यवधींची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:36 PM2019-07-20T23:36:14+5:302019-07-20T23:36:38+5:30

महापालिका क्षेत्रात जवळपास २५ ठिकाणे

Baidya Weekly Bazaar in Panvel; | पनवेलमध्ये बेकायदा आठवडी बाजार; कोट्यवधींची वसुली

पनवेलमध्ये बेकायदा आठवडी बाजार; कोट्यवधींची वसुली

googlenewsNext

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीत बेकायदेशीरपणे जवळपास २५ आठवडी बाजार भरवले जात आहेत. यावर कारवाई करण्यात महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील भार्ई-दादांकडून या ठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांकडून कोट्यवधींची वसुली केली जात आहे. आठवडी बाजारानिमित्त होणारी गर्दी, चोºयामाºया, बाजार उठल्यावर साचणारा कचºयामुळे परिसरातील नागरिक हैराण असून महापालिकेने या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर २५ पेक्षा जास्त आठवडी बाजार भरवले जात आहे. यासाठी महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता काही तरुणांकडून वेगवेगळ्या दिवशी हा बाजार भरवतात. उल्हासनगर, कल्याण, गोवंडी, मानखुर्द, मुंबई येथून व्यापारी माल विक्रीकरिता बाजारात येतात. कपडे, घरगुती वस्तू, भाजीपाला, खेळणी, चप्पल, शोभेच्या वस्तू, कटलरी यासारखा माल विक्रीकरिता यांच्याकडून प्रत्येकी १५० ते २०० रुपये घेतले जातात.

बाजारात ३०० ते ४०० फेरीवाले हजेरी लावत असल्याने एका दिवशी ६० हजार तर महिन्याला अडीच लाखांची वसुली परिसरातील भाई-दादांकडून केली जाते. वर्षाकाठी असे २५ बाजार भरवले तर ही कमाई कोट्यवधींच्या घरात जाते.

महापालिकेकेकडून कारवाई होत नसल्यानेच परिसरातील दादांकडून आठवडी बाजार भरवले जात असून कोट्यवधींची कमाई केली जात आहे. मात्र, या वेळी होणारी गर्दी, चोऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत आहे. स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन विभागाच्या परवानग्या न घेता बाजार भरवला जातो. महापालिकेकडून यावर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे परिसरातील परिवर्तन सामाजिक संस्थेचे महादेव वाघमारे यांनी स्पष्ट केले.

पनवेल पालिकेच्या महासभेत १९ नोव्हेंबर २०१८ रोजी आठवडी बाजारांबाबत ठराव मंजूर झाला होता. त्यानुसार महापालिकेने परवानगी देण्यात तत्परता दाखवली; परंतु या वेळी ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवले जात आहेत. यासाठी चालू तीन महिन्यांचा सातबारा उतारा, भूखंडाचा गटबुक नकाशा, आठवडी बाजार कशाप्रकारे बसवण्यासाठीचा लेआउट नकाशा, सदर गावचा नकाशा, भूखंड असेल तर झोन व त्या झोनचा दाखला, पोलीस ठाणे ना हरकत प्रमाणपत्र, वाहतूक पोलीस, अग्निशमन, सिडको, शासकीय जागा असेल तर महाराष्ट्र शासनाचे ना हरकत घेणे आवश्यक आहे; परंतु यापैकी एकही परवानगी न घेता बेकायदेशीर बाजार भरवले जातात. अशा बेकायदेशीर भरवल्या जाणाºया बाजारांवर कडक कारवाई होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या ठिकाणी भरतात आठवडी बाजार
पेंधर, पडघे, देवीचा पाडा, पालेखुर्द, तोंडरे, घोट, रोहिंजन, खारघर सेक्टर १९, २९, ३६, तळोजे फेज, नावडे फेज २, कळंबोली सेक्टर ५, ८, ९, १ई, रोडपाली सेक्टर १२, कामोठे सेक्टर २२, २१, १५, ८, १८, नवीन पनवेल डीमार्टसमोरील भूखंड, नवीन पनवेल देवीच्या मंदिरालगत, खांदा वसाहत.

महापालिकेकडून आठवडी बाजाराचे धोरण ठरविण्यात आले आहे. तसा महासभेत ठरावही झाला आहे. यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून बाजार भरवता येऊ शकतो. मात्र, परवानगीशिवाय आठवडी बाजार भरवण्यात येत असेल तर लवकरच मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल. - जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Baidya Weekly Bazaar in Panvel;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल