हवाईसुंदरीची आत्महत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:14 AM2018-04-03T05:14:55+5:302018-04-03T05:14:55+5:30

प्रियकराने फसवणूक केल्याने हवाई सुंदरीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सात वर्षांपासून प्रेमसंबंध असताना, प्रियकर अमोल दाभाडोने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केल्याचे समजताच गीतांजली उगले (२६) हिने वाशी येथे ८ फेब्रुवारीला वाशीतल्या मैत्रिणीकडे जाऊन विषप्राशन केले होती. 

 Aerospace Suicide | हवाईसुंदरीची आत्महत्या  

हवाईसुंदरीची आत्महत्या  

Next

नवी मुंबई - प्रियकराने फसवणूक केल्याने हवाई सुंदरीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. सात वर्षांपासून प्रेमसंबंध असताना, प्रियकर अमोल दाभाडोने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केल्याचे समजताच गीतांजली उगले (२६) हिने वाशी येथे ८ फेब्रुवारीला वाशीतल्या मैत्रिणीकडे जाऊन विषप्राशन केले होती. 
तिला वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते, परंतु प्रकृती गंभीर असल्याने, तिला तत्काळ मुंबईच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिचा मृत्यू झाला. तिच्या आईने अमोलविरोधात तक्रार दिली होती. तपासात अमोलने तिला लग्नास नकार दिल्याचे समोर आले. त्याच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.  
अमोलचे सात वर्षांपासून गीतांजलीवर प्रेम होते. त्याने लग्नाचे आमिषही दाखविले. मात्र, डिसेंबर महिन्यात त्याने दुसºयाच मुलीसोबत साखरपुडा केला. तिने अमोलकडे  याचा जाब विचारल्यानंतर त्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती.

Web Title:  Aerospace Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.