एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ३५ फुटी लांबीचा ८ टन वजनाचा मृत व्हेल मासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 06:37 PM2022-11-02T18:37:28+5:302022-11-02T18:38:11+5:30

लिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ३५  फुटी लांबीचा मृत व्हेल मासा वाहात आला आहे.

A 35 foot long 8 ton dead whale washed ashore on Elephanta Island | एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ३५ फुटी लांबीचा ८ टन वजनाचा मृत व्हेल मासा

एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर ३५ फुटी लांबीचा ८ टन वजनाचा मृत व्हेल मासा

googlenewsNext

मधुकर ठाकूर 

उरण :

एलिफंटा बेटावरील किनाऱ्यावर सुमारे ३५  फुटी लांबीचा मृत व्हेल मासा वाहात आला आहे.   एलिफंटा बेटावरील शेतबंदर जेट्टीच्या बाजूला मंगळवारी (१) समुद्राच्या लाटांनी हा अवजड मृत व्हेल मासा किनाऱ्यावर पोहोचला आहे.३५ लांबीचा व सुमारे ८- ९ टन वजनाचा मृत व्हेल माशांची विल्हेवाट 
लावण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आरएफओ नथुराम कोकरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह बेटावर पोहचले आहेत.अगदी सडलेल्या अवस्थेत आढळलेल्या सुमारे ९ टन इतक्या अवजड  मृत व्हेल माशांची विल्हेवाट लावण्याचे जिकरिचे काम करण्यासाठी सध्या तरी बेटावर कोणतीही साधने सामुग्री उपलब्ध नाही.त्यामुळे विल्हेवाट कशी लावायची या विवंचनेत वन अधिकारी पडले आहेत.

दफन करण्यासारखे स्थिती नसल्याने व दफनासाठीही यंत्र सामग्री, मनुष्यबळही उपलब्ध नसल्याने मृत व्हेल माशाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आरएफओ  नथुराम कोकरे यांनी दिली.

Web Title: A 35 foot long 8 ton dead whale washed ashore on Elephanta Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.