भरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 03:18 AM2018-11-15T03:18:33+5:302018-11-15T03:19:22+5:30

नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र : महापालिका प्रशासनाचा अजब कारभार; परीक्षांविषयी महापौरही अंधारात

55 examination centers across the state | भरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र

भरतीसाठी राज्यभरात ५५ परीक्षा केंद्रे, नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आरोग्य व अग्निशमन विभागासाठीच्या नोकरभरतीसाठी १६ ते १८ नोव्हेंबरला परीक्षा होत आहेत. यासाठी राज्यभर तब्बल ५५ परीक्षा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र असून येथील विद्यार्थ्यांना इतर शहरांमध्ये जाऊन परीक्षा द्यावी लागणार आहे. प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराविषयी महापौरांसह सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचा आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर आरोग्य व अग्निशमन विभागामध्ये ४४८ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी वर्तमानपत्रामध्ये रीतसर जाहिरात देऊन उमेदवारांकडून ५ ते २१ सप्टेंबर दरम्यान अर्ज मागविण्यात आले होते. यासाठीची लेखी परीक्षा १६ ते १८ नोव्हेंबरला होणार आहे. ही परीक्षा महापरीक्षा पोर्टलचा वापर करून घेतली जाणार आहे. ५५ केंद्रावर परीक्षा होणार आहे. वास्तविक नवी मुंबई महानगरपालिकेची भरती असल्यामुळे परीक्षाही मनपा क्षेत्रामध्ये होणे आवश्यक आहे. परंतु ती राज्यातील विविध शहरांमध्ये घेण्याचा अजब निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेचे अधिकारी जाऊन संबंधित शहरांमध्ये ही परीक्षा घेणार आहेत. अमरावती विभागामध्ये ३ केंद्रे, औरंगाबादमध्ये व कोकण विभागात १४ केंद्रे, नागपूर विभागात ५ व नाशिकसह पुणे विभागामध्ये प्रत्येकी ९ केंद्रे असणार आहेत. या केंद्रांसाठी समन्वय अधिकारी व निरीक्षक म्हणून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची निवड केली आहे. हे अधिकारी दोन ते तीन दिवस त्याठिकाणी जाऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडणार आहेत. यासाठी नियुक्ती केलेल्या अधिकाºयांना संबंधित ठिकाणी हजर होण्यासाठीचे कार्यालयीन आदेशही देण्यात आले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेमधील कर्मचारी भरती असून प्रत्यक्ष नवी मुंबईमध्ये फक्त एकच केंद्र आहे. पनवेलमध्ये तीन केंद्रांवर परीक्षा होणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रसायनी, रत्नागिरी येथेही केंद्रे निर्माण केली आहेत. परीक्षा आॅनलाइन पद्धतीने होणार असल्यामुळे संबंधित ठिकाणी संगणकापासून सर्व व्यवस्था केली जाणार आहे. वास्तविक परीक्षा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घेतली असती तरी त्याचे नियोजन करणे सोपे झाले असते. याशिवाय शहरातील इच्छुक उमेदवारांची गैरसोय टळली असते. राज्यातील इतर शहरांमधून येणाºया उमेदवारांनाही नवी मुंबईमध्ये येणे सहज शक्य आहे. परंतु प्रशासनाने सहा महसूल विभागामधील विविध शहरांची निवड का केली याची कोणतीच माहिती लोकप्रतिनिधींना दिलेली नाही. महापौर जयवंत सुतार यांनाही या माहितीपासून अंधारात ठेवले होते. सर्व नगरसेवक व पदाधिकाºयांनाही याची माहिती नाही. यामुळे महापौरांनीही तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून अधिकाºयांना धारेवर धरले आहे.

पारदर्शक भरतीचा पालिकेचा दावा

च्कर्मचारी भरतीसाठी राज्यातील ५५ केंद्रांवर परीक्षा घेतली जात असल्याबद्दल माहिती घेण्यासाठी पालिकेचे प्रशासन उपआयुक्त किरणराज यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संपूर्ण भरती प्रक्रिया महाराष्ट्र आयटी कार्पोरेशनच्या माध्यमातून राबविली जात आहे.

च्४४८ पदांसाठी तब्बल १९ हजार अर्ज आले आहेत. यासाठी संबंधितांकडून जिल्हानिहाय अर्जांची पडताळणी करून केंद्र निश्चित केली जातात असे स्पष्ट केले आहे. महापालिकेने भरतीप्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जात आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी भरती प्रक्रियेवर सुरुवातीपासून लक्ष दिले आहे.
च्संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन होणार असून मानवीय हस्तक्षेप होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा केंद्र ठरविण्याचा अधिकार परीक्षा घेणाºया यंत्रणेला आहे यामध्ये महापालिकेचा हस्तक्षेप नसतो असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भरती प्रक्रिया
रद्द करण्याची मागणी
कर्मचारी भरती पारदर्शकपणेच झाली पाहिजे याविषयी कोणाचेच दुमत नाही. परंतु ही परीक्षा नवी मुंबई मनपा क्षेत्राबाहेर घेण्याचे नक्की प्रयोजन काय याविषयी कोणतीही माहिती प्रशासनाने लोकप्रतिनिधींना दिलेली नाही. यामुळे महापौरांसह सर्वांमध्येच असंतोष आहे. महापौर जयवंत सुतार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊ न भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई महा पालिकेमधील कर्मचारी भरतीसाठीची परीक्षा याच शहरात झाली पाहिजे. येथील अधिकारी दुसºया शहरात जाऊन परीक्षा घेण्याचा अजब निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाची कोणतीही माहिती मलाही देण्यात आली नसून अशाप्रकारची मनमानी खपवून घेतली जाणार नाही.
- जयवंत सुतार,
महापौर, नवी मुंबई

विभागवार परीक्षा केंद्रांचा तपशील

विभाग केंद्र
अमरावती ३
औरंगाबाद १४
कोकण १४
नागपूर ५
नाशिक ९
पुणे ९

Web Title: 55 examination centers across the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.