एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करत असताना तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 11:12 AM2017-09-08T11:12:42+5:302017-09-08T11:15:10+5:30

फेसबुकवर आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करत असताना 18 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Youth committed suicide after video chat with Ax girlfriends | एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करत असताना तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या

एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करत असताना तरुणाने गळफास लावून केली आत्महत्या

Next

कोलकाता, दि. 8 - फेसबुकवर आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत व्हिडीओ चॅट करत असताना 18 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपली एक्स गर्लफ्रेंड दुस-या व्यक्तीसोबत नात्यात अडकल्याचं पाहून त्याला दुख: झालं होतं. तरुण पश्चिम बंगालमधील नॉर्थ 24 परगना येथील रहिवासी होती. बुधवारी संध्याकाळी फेसबुवर व्हिडीओ चॅट करत असताना आपल्या एक्स गर्लफ्रेंडसोबत तो भांडू लागला आणि अखेर गळफास  लावून आत्महत्या केली.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तरुणीला अटक केली आहे. तरुणीला बारासातमधील न्यायालयात हजर करण्यात आलं. दोघेही जवळपास दोन वर्ष एकत्र होते. कोचिंग क्लासमध्ये त्यांची ओळख झाली होती. तरुणीची अन्य तरुणाशी झालेल्या मैत्रीमुळे तरुण नाराज झाला होता. ज्यावरुन त्यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. 

तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नेहमी भांडत असतात. त्यांन ब्रेकअपही करायचं होतं. जेव्हा तरुणीने अन्य तरुणासोबतचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले तेव्हा परिस्थिती अजून बिघडली. यानंतर तरुणाने भेटण्याची इच्छा व्यक्त केली असता तरुणीने नकार दिला. यावरुन दोघांचं फेसबुकवर व्हिडीओ चॅट करत असताना भांडण झालं. 

भांडण झाल्यानंतर नैराश्यग्रस्त झालेल्या तरुणाने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं आणि फेसबुकवर लाईव्ह चॅट सुरु असतानाच गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीला अटक केली आहे. 

याआधीही अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत जेव्हा लाईव्ह किंवा चॅट करत असताना एखाद्याने आत्हमत्या केली आहे. बांगलादेशी मॉडेल रिसीला बिंते हिने पतीसोबत लाईव्ह चॅट करताना गळफास लावून आत्महत्या केली. ढाक्यात राहणारी रिसीला केवळ २२ वर्षांची होती. या आत्महत्येमागे कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. पतीसोबत व्हिडिओ चॅट करता करता अचानक असे काय घडले की, तिने आत्महत्या केली, तूर्तास तरी हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पोलिस अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसीला व तिच्या पतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.

Web Title: Youth committed suicide after video chat with Ax girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.