याकूब मेमन फासावर लटकणार

By admin | Published: May 21, 2014 10:27 AM2014-05-21T10:27:28+5:302014-05-21T11:06:35+5:30

१९९३ च्या बाँबस्फोटांमधील दोषी याकूब मेमनभोवती कायद्याचा फास आवळला असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मेमनची दयायाचिका फेटाळली आहे.

Yakub Memon hangs | याकूब मेमन फासावर लटकणार

याकूब मेमन फासावर लटकणार

Next

नवी दिल्ली, दि. २१ - १९९३ च्या बाँबस्फोटांप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेमनभोवतीचा फास आणखी आवळला गेला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मेमनची दयायाचिका फेटाळली असून याकूबला फाशी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. 

१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांप्रकरणी याकूब मेमनला टाडा कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टानेही ही शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयानंतर याकूब मेमनच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे दयायाचिका करण्यात आली होती. बुधवारी प्रणव मुखर्जींनी मेमनची दया याचिका फेटाळून लावल्याचे वृत्त आहे. मेमनचे कृत्य हे देशद्रोही असून तो माफीस पात्र ठरत नाही असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. सध्या मेमन नागपूरमधील तुरुंगात शिक्षा भोगत असून राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यावर आता त्याला फाशी कधी दिली जाईल याचा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे.  

 

दोन दहशतवाद्यांना फाशीऐवजी जन्मठेप
दरम्यान, अन्य एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने २००२ मधील अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यात दोषी ठरलेल्या दोघा दहशतवाद्यांना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आफताब अन्सारीला आजन्म ठेप तर जमीलउद्दीन नासीरला किमान ३० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

Web Title: Yakub Memon hangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.