...तर काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसवू

By admin | Published: July 11, 2017 06:24 AM2017-07-11T06:24:27+5:302017-07-11T06:24:27+5:30

पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते

... in which a Chinese army would enter Kashmir | ...तर काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसवू

...तर काश्मीरमध्ये चिनी सैन्य घुसवू

Next

बीजिंग : पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते, असा इशारा देत आम्हीच तेथून काश्मीरमध्ये घुसू, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी सूचित केले आहे. सिक्किमजवळील डोकलामच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने प्रथमच या वादात काश्मीरमध्ये घुसण्याची अप्रत्यक्ष भाषा सुरू केली आहे. चीनने तिसऱ्या देशाचे सैन्य असा उल्लेख केला असला तरी त्या देशाची स्वत:च तिथून काश्मिरात घुसण्याची तयारी असल्याचे मानले जाते.
एकीकडे भारत व पाकिस्तान संबंध तणावाचे आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी लष्कर भारताच्या दिशेने गोळीबार व तोफांचे मारे करीत आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास मदत करणे आणि काश्मीरमधील अतिरेक्यांना सततची मदत हाही पाकिस्तानच्या कारवायांचा भाग आहे. त्यातच भारत व अमेरिका संबंध वृद्धिंगत होत असल्याने पाकिस्तान व चीन दोघेही अस्वस्थ आहेत. पाकमधील अनेक प्रकल्पांमध्ये सध्या चीनची गुंतवणूक असून, हे दोन्ही देश आता मित्रच बनले आहेत.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने विनंती केल्यास काश्मीरमध्ये घुसण्याची धमकी देणे, याला बराच अर्थ आहे. सरकारी मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, ज्या प्रकारे डोकलाममध्ये चीनचे रस्त्याचे काम भारतीय सैन्याने रोखले आहे, ते पाहता पाकिस्तानच्या विनंतीवरून काश्मीरमध्ये तिसऱ्या देशाचे (पान ९ वर)(पान १ वरून) सैन्य घुसू शकते. भारताकडून भूतानचे क्षेत्र वाचविण्याचा प्रयत्न होत असेल तर, तो त्यांच्या क्षेत्रापर्यंतच मर्यादित असायला हवा. वादग्रस्त क्षेत्रासाठी नकोय. अन्यथा, भारताच्याच तर्काने कृती करायची झाल्यास तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मीरसह वादग्रस्त क्षेत्रात घुसू शकते.
या लेखात म्हटले आहे की, भारतीय सैनिकांनी भूतानला मदत करण्याच्या नावाखाली चीनच्या डोकलाम भागात प्रवेश केला
आहे. भारताकडून दुसऱ्या देशाच्या अंतर्गत प्रश्नात दखल न देण्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्याकडून संयुक्त राष्ट्राच्या घोषणापत्राचे उल्लंघन होत आहे. भारताने सिक्किमवरही असाच ताबा मिळविला आहे. भारताला अशी भीती आहे की, चीन सैन्याच्या बळावर पूर्वोत्तर भारताला मुख्य भारतापासून वेगळे करेल. (वृत्तसंस्था)
>चीनच्या राजदूतांना राहुल गांधी भेटल्याने वादळ
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चीनच्या भारतातील राजदूतांच्या घेतलेल्या भेटीवरून काँग्रेसवर भाजपाने हल्ला चढविला असून, काँग्रेसनेही तशाच कडक भाषेत भाजपा व मोदी सरकारवर प्रतिहल्ला केला आहे. शनिवारी गांधी आणि चीनचे भारतातील राजदूत लुओ ज्हाओहुई यांची भेट झाली. त्यावरून भाजपाने राहुल यांच्यावर हल्ले सुरू केले. काँगे्रसनेही त्याला तसेच उत्तर देताना चीनने द्विपक्षीय चर्चेला नकार दिल्यानंतरही जर्मनीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी का गेले, असा प्रश्न विचारला आहे.
>भारताने भूतानचा मान ठेवावा!
लेखात असेही म्हटले आहे की, चीनचे रस्त्याचे काम म्हणजे भारताविरुद्धचा भूराजकीय उद्देश असल्याचे भारताचे
म्हणणे आहे. मात्र, भारत स्वत: असे करण्यास अक्षम असल्यामुळेच चीनचे
काम त्यांनी रोखले आहे. भारताची कृती
ही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणारी आहे. चीन आणि भुतान यांच्यातील वाद दोन्ही पक्षांनी सोडवायला हवा आणि भारताने भुतानच्या सार्वभौमत्वाचा सन्मान करायला हवा.

Web Title: ... in which a Chinese army would enter Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.