केंद्रात 'भावा'चे सरकार असताना राम मंदिरासाठी आंदोलन कशाला?- तोगडिया

By admin | Published: January 16, 2016 09:58 AM2016-01-16T09:58:21+5:302016-01-16T12:25:57+5:30

केंद्रात आमच्या भावाचे (पंतप्रधान नरेंद्र मोदी) सरकार असताना राम मंदिरासाठी आंदोलन करण्याची गरज नाही, असे वक्तव्य विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांनी केले.

When the 'Bhava' government is at the center, why should the agitation for Ram Mandir? - Togadia | केंद्रात 'भावा'चे सरकार असताना राम मंदिरासाठी आंदोलन कशाला?- तोगडिया

केंद्रात 'भावा'चे सरकार असताना राम मंदिरासाठी आंदोलन कशाला?- तोगडिया

Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १६ - केंद्रात आमच्या भावाचे ( पंतप्रधान नरेंद्र मोदी) सरकार असताना राम मंदिरासाठी आंदोलन करण्याची गरज नाही, असे वक्तव्य विहिंप (विश्व हिंदू परिषद) नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे. लखनऊमध्ये शुक्रवारी धर्म रक्षा निधी अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
' राम मंदिर तर बनेलच, पण त्यासाठी आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. केंद्रात आपलेच सरकार आहे, मग आपल्या सरकारविरोधात कधी कोणी आंदोलन करतं का' असा सवाल तोगडिया यांनी विचारला. ' राम मंदिराचा मुद्दा आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाही. सरदार पटेल यांनी संसदेत कायदा बनवून सोमनाथ मंदिर उभारले होते. तसेच पंतप्रधान मोदींनीही संसदेत कायदा बनवून राम मंदिर उभारले पाहिजे' असेही ते म्हणाले. यापूर्वीही तोगडिया यांनी अयोध्येत मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा बनविण्याची मागणी केली होती. 
 

Web Title: When the 'Bhava' government is at the center, why should the agitation for Ram Mandir? - Togadia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.