RSS, Beef eating: "नाईलाज म्हणून गोमांस खाणाऱ्यांसाठी..."; RSSचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 01:54 PM2023-02-02T13:54:03+5:302023-02-02T13:55:01+5:30

"जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंदू आहे."

We can not close doors for those who ate beef under with compulsion says Dattatreya Hosabale | RSS, Beef eating: "नाईलाज म्हणून गोमांस खाणाऱ्यांसाठी..."; RSSचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे विधान

RSS, Beef eating: "नाईलाज म्हणून गोमांस खाणाऱ्यांसाठी..."; RSSचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेंचे विधान

googlenewsNext

RSS, Dattatreya Hosabale: काही लोक असे आहेत की ज्यांना नाईलाजास्तव गोमांस खावे लागले आहे. अशा लोकांसाठी आम्ही आमची दारं बंद करू शकत नाही. अशा लोकांना आम्ही धर्मवापसी करून घेऊ शकतो, असा खणखणीत मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायमच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी विचारधारा आहे. त्यामुळे धर्मपरिवर्तनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील पदाधिकाऱ्यांच्या काही ठाम भूमिका आहेत. तशातच  सरकार्यवाह म्हणाले की, असे काही लोक आहेत ज्यांनी नाईलजाने गोमांस खाल्ले असेल, त्यांच्यासाठी आम्ही धर्माची दारं बंद न करता त्यांची धर्मवापसी करवून घेणं शक्य आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी मोठे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहाद हा मुद्दा गाजत आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मतमतांतरे आहेत. अशा वेळी म्हणाले की, असे काही लोक आहेत ज्यांना नाईलाज म्हणून गोमांस खायला लावले असू शकते. पण आम्ही त्यांच्यासाठी दार बंद करू शकत नाही. अशा लोकांना आपण पुन्हा आपल्या हिंदू धर्मात आणू शकतो. त्यांच्याकडून ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्याला त्यांचा नाईलाज होता. त्यामुळे त्यांच्यावर सरसकट टीका करणे योग्य नाही. 

दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, "ज्यांचे पूर्वज हिंदू आहेत, ते हिंदू आहेत. ते आज कोणती पूजा करत आहेत, आता काय करत आहेत, हा आपला विचार नाही. जो स्वतःला हिंदू समजतो तो हिंदू आहे. एक तिसराही आहे, ज्यांना आपण हिंदू म्हणतो पण ते हिंदू नाहीत. देशात सुमारे ६०० हून अधिक जमाती आहेत. आम्ही वेगळे आहोत असे या जमातींचे म्हणणे आहे. आम्ही हिंदू नाही. त्यांना चिथावणी देण्याचे काम भारतविरोधी शक्तींनी केले आहे.

घरी परत येऊ शकतो!

"गोळवलकर गुरुजींनी मी हिंदू असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत जर आपण 'वसुधैव कुटुंबकम्'च्या  दिशेने विचार आहोत आणि पुढे जात आहोत. अशा वेळी ज्या लोकांच्याबाबतीत काही नाईलाजास्तव घटना घडल्या तर अशा लोकांसाठी दरवाजे बंद करू शकत नाही. दत्तात्रय होसाबळे म्हणाले की, ज्यांनी बळजबरीने गोमांस खाल्ले आहे, त्यांना आम्ही सोडू शकत नाही. आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे बंद करू शकत नाही. तरीही आम्ही त्यांना घरी परत आणू शकतो," असेही होसबाळे म्हणाले.

Web Title: We can not close doors for those who ate beef under with compulsion says Dattatreya Hosabale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.