मराठवाड्यात १४७७ खेड्यांना होतोय टँकरद्वारे पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:15 AM2019-07-16T04:15:07+5:302019-07-16T04:15:14+5:30

मराठवाड्यात १४७७ खेडी/वसाहतींना या वर्षी पाच जुलैपर्यंत १६८४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला गेला, अशी माहिती सरकारने राज्यसभेत सोमवारी दिली.

 Water Supply through Tanker is being started in 1477 villages in Marathwada | मराठवाड्यात १४७७ खेड्यांना होतोय टँकरद्वारे पाणीपुरवठा

मराठवाड्यात १४७७ खेड्यांना होतोय टँकरद्वारे पाणीपुरवठा

Next

नवी दिल्ली : मराठवाड्यात १४७७ खेडी/वसाहतींना या वर्षी पाच जुलैपर्यंत १६८४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला गेला, अशी माहिती सरकारने राज्यसभेत सोमवारी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून असलेली मागणी आणि निकषानुसार पुरेशा संख्येत टँकर्सची तरतूद केली गेली आहे, असे सरकारने म्हटले आहे.
जल शक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री रत्तन लाल कटारिया यांनी एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारने पाणीटंचाईचा प्रश्न हाताळण्यासाठी तसेच पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हानिहाय कृती योजना व सर्वसमावेशक मार्गदर्शन जारी केले आहे.
>या आहेत उपाययोजना
पाणीटंचाई दूर करण्यासाठीच्या उपायांत विहिरी खोदणे, सध्याच्या हापशांना दुरुस्त करणे, खासगी विहिरींचे तसेच कूपनलिकांचे अधिग्रहण, विहिरी खोल करणे, नव्या परंतु तात्पुरत्या स्वरूपात पाईपद्वारे पाणीपुरवठ्याच्या योजनांना मंजुरी, टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याचा समावेश आहे.

Web Title:  Water Supply through Tanker is being started in 1477 villages in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.