मुलांना धमकावून नाही शिकवलं जाऊ शकत, रडणा-या चिमुरडीचा व्हिडीओ पाहून विराट कोहलीही कळवळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 17:00 IST2017-08-19T16:38:38+5:302017-08-19T17:00:29+5:30
सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अत्यंत वाईट पद्धतीनं या चिमुरडीवर ओरडून, मारझोड करुन तिला शिकवताना दिसत आहे. संताप आणणारा असा हा व्हिडीओ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत राग व्यक्त केला आहे.

मुलांना धमकावून नाही शिकवलं जाऊ शकत, रडणा-या चिमुरडीचा व्हिडीओ पाहून विराट कोहलीही कळवळला
नवी दिल्ली, दि. 19 - सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अत्यंत वाईट पद्धतीनं या चिमुरडीवर ओरडून, मारझोड करुन तिला शिकवताना दिसत आहे. संताप आणणारा असा हा व्हिडीओ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत राग व्यक्त केला आहे.
महिलेच्या अमानुष वागणुकीमुळे कळवळून रडणारी या चिमुरडीचा व्हिडीओ कुणीही पाहिला तर त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा त्रासदायक व्हिडीओ विराटनं सोशल मीडियावर शेअर करत म्हटले आहे की, ''खरं तर आपण या मुलीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत आहोत. मुलांना शिकवताना आपण इतक्या अहंकारात बुडालो आहोत की आपल्याला त्या बाळाच्या वेदनादेखील दिसेनाशा झाल्या आहेत. अशा अमानुष प्रकारे एखाद्या मुलाला शिकवण्याची पद्धत पाहून मी दुःखी झालो आहे''. ''एका लहान मुलाला कधीही धमकावून शिकवल्यास तो काहीही शिकत नाही, अत्यंत दुःखदायक'', अशा शब्दांत विराटनं या चिमुरडीच्या व्हायरल व्हिडीओबाबत दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, विराट कोहली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. कोणत्या-न्-कोणत्या सामाजिक मुद्यावर तो आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेहमी मांडताना, त्याविरोधात आवाज उठवताना पाहायला मिळतो.
काय आहे व्हिडीओमध्ये ?
या व्हिडीओमध्ये एक महिला जवळपास 3 ते 4 वर्षांच्या चिमुरडीला अत्यंत अमानुष वागणूक देत आहे. अत्यंत वाईट पद्धतीनं ही महिला तिच्यावर ओरडून, मारझोड करुन तिला शिकवत आहे. तिच्या या वागणुकीनं हैराण झालेली ही मुलगी अक्षरशः कळवळून रडत आहे. रडत रडतच ती त्या महिलेला विनंतीही करत आहे की, प्रेमानं बोलशील का, माझा कान आणि डोके दोन्ही खूप दुखू लागले आहे. पण तरीही या महिलेनं तिचा छळ काही थांबवला नाही. उलट तिच्यावर आणखीच ओरडू लागली. मनाला पिळवटून टाकणार असा हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला जात असून या महिलेच्या वागणुकीवर सर्वच जण संताप व्यक्त करत आहेत.