सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी दिल्यास विजय मल्ल्या भारतात परतण्यास तयार

By admin | Published: May 16, 2016 10:26 AM2016-05-16T10:26:16+5:302016-05-16T10:26:16+5:30

मी भारतात परत येऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, पण माझ्या सुरक्षेची आणि स्वातंत्र्याची हमी देण्यात यावी असं विजय मल्ल्या बोलले आहेत

Vijay Mallya is ready to return to India if he is guaranteed safety and independence | सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी दिल्यास विजय मल्ल्या भारतात परतण्यास तयार

सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी दिल्यास विजय मल्ल्या भारतात परतण्यास तयार

Next
>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 16 - बँकांचे 9000 कोटी रुपये बुडवून परदेशात निघून गेलेल्या विजय मल्ल्यांनी आपण दिलेलं वचन पाळण्याची हमी दिली आहे. तसंच स्टेट बँक ऑफ इंडियासहित इतर बँकांसमोर ठेवलेल्या नव्या प्रस्तावावर लवकरच काम करण्यास सुरुवात करणार असल्याचं विजय मल्ल्यांनी सांगितलं असल्याची माहिती युनायटेड ब्रेवरीज लिमिटेडच्या (युबीएल) बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी दिली आहे. व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे विजय मल्ल्यांसोबत झालेल्या बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये ते सहभागी झाले होते. 
 
शुक्रवारी मुंबईत युबीएलची बोर्ड मीटिंग पार पडली. यावेळी विजय मल्ल्या लंडनहून व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. 'आम्ही अनेक विषयांवर चर्चा करत चिंता व्यक्त केली, मल्ल्या यांनी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरात लवकर कर्ज फेडू अशी हमी दिली आहे. मी भारतात परत येऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे, पण माझ्या सुरक्षेची आणि स्वातंत्र्याची हमी देण्यात यावी असं विजय मल्ल्या बोलले आहेत', अशी माहिती स्वतंत्र बोर्ड सदस्य किरण मजुमदार शॉ यांनी दिली आहे. 
 
'मल्ल्या यांनी मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचं, तसंच कर्ज फेडण्यासाठी माझी तयारी आहे असं म्हटलं आहे. बोर्ड सदस्य मल्ल्यांच्या पाठीशी उभे आहोत, पुढील ऑगस्ट महिन्यात होणा-या बैठकीआधी कंपनीच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहोत', असं स्वतंत्र बोर्ड सदस्य सुनील यांनी सांगितलं आहे.
 
विजय मल्ल्यांना रेड कॉर्नर नोटीस - 
मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्यांना रेड कॉर्नर नोटिस पाठवण्याची तयारी केली आहे. ईडीने विजय मल्यांना रेड कॉर्नर नोटिस पाठवण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली आहे. लोकमतला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडी विजयमल्ल्यांच्या भारतातील संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यास सुरुवात करणार आहे. ईडी सध्या फक्त आयडीबीयच्या  900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत आहे. इतर तपासयंत्रणांशी चर्चा केल्यानंतर १७ बँकांच्या थकलेल्या 9000 कोटी कर्जासंबंधीही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
 
ब्रिटनची भुमिका -
१९७१ च्या इमिग्रेशन अ‍ॅक्टअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीजवळ ब्रिटनमध्ये प्रवेश करतेवेळी वैध पासपोर्ट असेल तर देशात वास्तव्य करतानादेखील त्या व्यक्तीजवळ वैध पासपोर्ट असलाच पाहिजे याची ब्रिटनला आवश्यकता वाटत नाही, असे ब्रिटन सरकारने सांगितले आहे. सोबतच ब्रिटनने मल्ल्यांविरुद्धच्या आरोपांचे गांभीर्य मान्य केले आहे आणि भारत सरकारची मदत करण्याची इच्छा जाहीर केली आहे. परस्पर कायदेशीर सहकार्य किंवा प्रत्यार्पणाच्या भारताच्या विनंतीवर आपण विचार करू शकतो, असे ब्रिटनने सांगितले आहे,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. 1993 मध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यादरम्यान प्रत्यार्पण करार झाला होता. या कराराअंतर्गत आता मल्ल्यांचे प्रत्यार्पण केले जाऊ शकते.
 
मल्ल्यांचं पलायन - 
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
 

Web Title: Vijay Mallya is ready to return to India if he is guaranteed safety and independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.