वाराणसीत घाटांचे बदलले नशीब

By Admin | Published: May 25, 2015 03:01 AM2015-05-25T03:01:03+5:302015-05-25T03:01:03+5:30

वाराणशीला गेलेला व्यक्ती घाटावर जाणार नाही, असे शक्य नाही. या घाटांशी माझी जुनी ओळख आहे. परंतु या वेळी मात्र मी येथील बदललेल्या स्थितीची माहिती

Varanasi Ghats changed luck | वाराणसीत घाटांचे बदलले नशीब

वाराणसीत घाटांचे बदलले नशीब

googlenewsNext

विकास मिश्र, वाराणसी
वाराणशीला गेलेला व्यक्ती घाटावर जाणार नाही, असे शक्य नाही. या घाटांशी माझी जुनी ओळख आहे. परंतु या वेळी मात्र मी येथील बदललेल्या स्थितीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आलो आहे. हा पंतप्रधानांचा मतदारसंघ असून त्यांनी येथील घाटांच्या सफाईचा संकल्प केला आहे. बनारस लाईव्हचा पहिला प्रवास या घाटांच्या किनाऱ्यावरून सुरु होतो...!
मी यावेळी दशाश्वमेध घाटावर आहे. हा घाट वाराणशीच्या सर्वात प्रमुख घाटांपैकी एक असून येथे सर्वात जास्त गर्दी राहते. पर्व, सणासुदीच्या दिवसात येथे २ लाखावरून अधिक लोक स्नान करतात. त्यामुळे या घाटाच्या सफाईचे काम सर्वात कठीण आहे. दोन वर्षापूर्वी जेंव्हा मी येथे आलो होतो तेंव्हा या घाटावर स्नान करण्याची माझी हिंमत झाली नव्हती. तेंव्हा घाटाच्या खाली कचरा पडून होता. स्नान करण्यासाठी मला नावेतून गंगेच्या दुसऱ्या तीरावर जावे लागले होते. परंतु या वर्षी मी या घाटावर आंघोळ केली. हे आहे बनारसच्या या घाटाचे बदललेले चित्र ! याला आपण चमत्कार नाही म्हटले तरी चालेल परंतु आशेचा किरण नक्कीच दिसत आहे. दशाश्वमेध घाटावर जाणारे रस्तेही अतिशय स्वच्छ दिसू लागले आहेत. गोदौलिया चौकार ठंडाईची दुकान लावणाऱ्या राजु केसरी म्हणाला की, मोदी यांनी घाटाच्या किनाऱ्यांच्या सफाईचे काम पूर्ण केले आहे. वाराणशीत प्रमुख ८० घाट आहेत. पहिला घाट म्हणजे आदिनाथ घाट आहे. चला आता या ८० घाटांपैकी जेथून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेला सुरुवात केली. नावेतून प्रवास करण्यासाठी एक तास लागतो. दरभंगा घाट, राना महाल घाट, राजा घाट आणि खुप सारे घाट आहेत. सर्व घाटांच्या किनाऱ्यावर नागरिक आंघोळ करताना दिसत आहेत. मागील वेळी जेंव्हा मी येथे आलो तेंव्हा या घाटांवर इतकी घाण होती की कोणीही आंघोळ करण्याची हिंमत करीत नव्हता. आता पाण्यात घाण दिसत नाही. माझी नाव चालविणारा रमेश शंकर म्हणाला, आता पाणी स्वच्छ असल्यामुळे कोणीही त्यात घाण टाकत नाही. येथे येणाऱ्यांच्या वागणुकीत बदल होत आहे. प्रत्येकजण वाराणशीच्या घाटांना आणि गंगेला स्वच्छ पाहू इच्छीत आहे. येथील स्वच्छता पाहून मनाला आनंद झाला असून गंगेचे पाणीही स्वच्छ व्हावे अशी मनोमन इच्छा झाली. तेंव्हा माझी दृष्टी राजा घाटाच्या जवळील ड्रेनेजच्या एका मोठ्या पाईपवर पडली. त्यात थोडेच पण ड्रेनेजचे पाणी येत होते. तेथेच एक व्यक्ती शौचास बसला होता. माझ्या नाव चालविणाऱ्याने सांगितले की, ‘इनका समझावे मोदी अईहें का ?’
काशीचा अस्सी
आता आम्ही अस्सी घाटावर पोहोचलो. हा लेखक, कवि, कलावंत आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्वानांचा आवडता घाट आहे. कला आणि संस्कृतीचा येथे मेळ होतो. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी सफाईची सुरुवात येथून केली. दशाश्वमेध घाटाच्या तुलनेत येथे गर्दी कमी आहे. दुधी रंगाच्या पांढऱ्या प्रकाशाने हा घाट न्हाऊन निघाला आहे. अस्सी घाटावर सरासरी ३०० नागरिक प्रति तासाला येतात. सणासुदीच्या काळात ही संख्या २५०० प्रतितास एवढी होते. येथे एकाच वेळी २२ हजार ५०० लोक जमा होऊ शकतात. मी येथे विदेशी पर्यटकांची गर्दी पाहत आहे. तेंव्हा माझे लक्ष जवळच खोदकाम करीत असलेल्या मशीनवर गेली. मशीन दुसऱ्या घाटावर आहे. परंतु तो सुद्धा अस्सी घाटाचाच भाग आहे. येथे दिवसरात्र काम सुरु आहे. येथे २६ मे रोजी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम होणार आहे. मी आता त्या पप्पू चहावाल्याच्या दुकानावर जाऊ इच्छित आहे, जो नरेंद्र मोदींच्या निवडणुकीत त्यांच्या नामांकनातील एक प्रस्तावक होता. पप्पुच्या दुकानाला १०० वर्षाच्या वर दिवस झाले. याच घाटाच्या नावावर प्रसिद्ध लेखक काशीनाथ सिंह यांनी ‘काशी का अस्सी’ ही कादंबरी लिहिली. सध्या वेळेचे बंधन आणि बातमी द्यायची असल्यामुळे तेथे थांबणे शक्य नाही. चला परत जाऊ, पप्पुचा चहा याच प्रवासात कधीतरी घेऊ. परत येताना हिंदी साहित्यिक केदारनाथ सिंह यांच्या काही ओळी आठवत आहेत. वाराणशीच्या बाबतीत त्यांनी अगदी छान रचना केली आहे....
इस शहर में धूल
धीरे-धीरे उड़ती है.
धीरे-धीरे चलते हैं लोग
धीरे-धीरे बजते हैं घंटे
शाम धीरे-धीरे होती है
या मंद शहरात राहणाऱ्या कमीत कमी घाटांचा विकास तरी मंदगतीने झाला नाही. घाटांचे चित्र पार बदलले आहे.

Web Title: Varanasi Ghats changed luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.