कचऱ्यापासून रस्ता योजना कागदावरच, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:52 AM2018-06-15T05:52:42+5:302018-06-15T05:52:42+5:30

गाझीपूरमधील कचºयाच्या वाढत्या डोंगरांची विल्हेवाट कशी लावायची हा गंभीर प्रश्न बनला आहे. या कचºयाचा वापर दिल्ली-मेरठ मार्गाच्या निर्मितीसाठी करण्याची योजना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी आखली होती.

Union Transport Minister Nitin Gadkari's confession | कचऱ्यापासून रस्ता योजना कागदावरच, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींची कबुली

कचऱ्यापासून रस्ता योजना कागदावरच, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींची कबुली

- संतोष ठाकूर
नवी दिल्ली  - गाझीपूरमधील कचºयाच्या वाढत्या डोंगरांची विल्हेवाट कशी लावायची हा गंभीर प्रश्न बनला आहे. या कचºयाचा वापर दिल्ली-मेरठ मार्गाच्या निर्मितीसाठी करण्याची योजना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी आखली होती. मात्र ती प्रत्यक्षात येण्याचे चिन्ह नाही.
विविध खात्यांतील हेवेदावे, कचºयाचे रूपांतर रस्ता बांधणीस योग्य करण्यात टाळाटाळ व कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रांची खरेदी या कारणांमुळे योजना पुढे न सरकल्याची खंत गडकरींनी व्यक्त केली.
रस्तेबांधणीसाठी गाझीपूर डेपोतील कचºयाचा वापर होणार होता. चाचणी केल्यानंतर आतील थरासाठीही त्याचा वापर शक्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गडकरींनी सर्व विभागांना एकत्र आणून हे काम पूर्ण करण्याची घोषणा केली होती.
रस्तेबांधणीसाठी सिमेंटची गरज लक्षात घेऊन उत्पादक संगनमताने अधिक दर आकारत असल्याचा आरोप गडकरींनी केला. काही कंपन्या आॅफिसमध्ये बसूनच महामार्गाचा अहवाल (डीपीआर) लिहीत असल्याचे लक्षात आले. या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची तयारी गडकरींनी चालवली आहे.

Web Title: Union Transport Minister Nitin Gadkari's confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.