उद्धव ठाकरेंचा दौरा; अयोध्येत सुरक्षेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 01:29 AM2018-11-23T01:29:10+5:302018-11-23T01:29:27+5:30

अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही लाख लोक त्यादिवशी अयोध्येत जमतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस, धडक कृती दल आणि दहशतवादविरोधी पथके तिथे आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Uddhav Thackeray's visit; Security in Ayodhya increased | उद्धव ठाकरेंचा दौरा; अयोध्येत सुरक्षेत वाढ

उद्धव ठाकरेंचा दौरा; अयोध्येत सुरक्षेत वाढ

Next

लखनौ : राममंदिर प्रश्न विविध राजकीय पक्षांकडून पद्धतशीरपणे तापविण्यात येत असल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काही हजार शिवसैनिकांसह अयोध्या दौरा आणि त्याच काळात रविवारी होणारी धर्मसंसद यामुळे धडक कृती दल (आरएएफ) व दहशतवादविरोधी पथके अयोध्येत तैनात करून सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
अयोध्येत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही लाख लोक त्यादिवशी अयोध्येत जमतील, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पोलीस, धडक कृती दल आणि दहशतवादविरोधी पथके तिथे आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अयोध्येमध्ये हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी वादग्रस्त बाबरी मशीद उद््ध्वस्त केली होती.
उत्तर प्रदेशचे गृहसचिव अरविंदकुमार यांनी सांगितले की, अयोध्येत जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, असे पोलिसांनी ठरविले आहे. तिथे जमलेले लोक मुस्लिमांवर हल्ला करतील ही भीती अनाठायी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Uddhav Thackeray's visit; Security in Ayodhya increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.