दिल्लीत मोठा अपघात! ट्रकने डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:02 AM2022-09-21T11:02:49+5:302022-09-21T11:19:20+5:30

सीमापुरी परिसरातील डिव्हायडरवर झोपलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडले, या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी आहेत.

truck accident in Delhi Truck crushed those sleeping on the divider 4 people died | दिल्लीत मोठा अपघात! ट्रकने डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दिल्लीत मोठा अपघात! ट्रकने डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

Next

नवी दिल्ली: दिल्लीत मध्यरात्री मोठा अपघात झाला आहे. सीमापुरी परिसरातील डिव्हायडरवर झोपलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडले, या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मध्यरात्री २ च्या दरम्यान घडली. 

या अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटली आहे. करीम (वय ५२), मनीष (वय २५), प्रदीप (वय ३०), छोटे खान (३८), शाह आलम (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत. तर मनीष (३०), प्रदीप (३०)अशी जखमींची नावे आहेत. या अपघातानंतर आरोपी ट्रक चालक ट्रकसह फरार झाला. आरोपीचा तपास पोलीस करत आहेत. 
   
मिळालेली माहिती अशी, रात्री १. ५१ वाजता एक ट्रक भरधाव वेगाने डिव्हायडरवर आला आणि डिव्हायडरवर झोपलेल्यांना चिरडले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू असून २ जण गंभीर जखमी आहेत.जखमींना सीमापूर येथील एमपीव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरधाव टेम्पोच्या धडकेत आडत व्यापारी जागीच ठार, एक गंभीर  

जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृत्यू झालेल्या ४ जणांपैकी २ जण गंभीर जखमी झाले होते, या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: truck accident in Delhi Truck crushed those sleeping on the divider 4 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.