धक्कादायक! तेलंगणामध्ये टीआरएस नेत्याची दगडाने ठेचून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 12:03 PM2018-11-06T12:03:47+5:302018-11-06T12:27:51+5:30

तेलंगणामध्ये राजकीय संघर्षात तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते नारायण रेड़्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

trs leader narayana reddy stoned to death in telanganas vikarabad | धक्कादायक! तेलंगणामध्ये टीआरएस नेत्याची दगडाने ठेचून हत्या

धक्कादायक! तेलंगणामध्ये टीआरएस नेत्याची दगडाने ठेचून हत्या

हैदराबाद -  तेलंगणामध्ये राजकीय संघर्षात तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते नारायण रेड़्डी यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विकराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात ही धक्कादायक घटना घडली. मंगळवारी (6 ऑक्टोबर) सकाळी नारायण रेड्डी यांचा मृतदेह सापडला. रेड्डी यांच्या हत्येची माहिती मिळताच आक्रमक झालेल्या रेड्डी समर्थकांनी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. दोन्ही कार्यकर्त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी नारायण गट आणि त्यांच्या प्रतिस्पर्धक गटामध्ये वाद झाला होता. त्यानंतर उसळलेल्या संघर्षात टीआरएसच्या नेत्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत गावामध्ये मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहे.

Web Title: trs leader narayana reddy stoned to death in telanganas vikarabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.