गुजरात: आदिवासी तरुणीचं अपहरण करुन दोन आठवडे बलात्कार; आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 09:10 AM2018-04-13T09:10:00+5:302018-04-13T09:10:00+5:30

कठुआ आणि उन्नवनंतर आता गुजरातमध्ये बलात्काराची घटना समोर आली आहे

Tribal girl abducted raped for two weeks in Gujarat | गुजरात: आदिवासी तरुणीचं अपहरण करुन दोन आठवडे बलात्कार; आरोपी फरार

गुजरात: आदिवासी तरुणीचं अपहरण करुन दोन आठवडे बलात्कार; आरोपी फरार

Next

गुजरात: कठुआ आणि उन्नवमधील बलात्कारामुळे देशातील वातावरण ढवळून निघालं असताना आता गुजरातमध्येही असाच प्रकार घडला आहे. तापी जिल्ह्यातील उच्चल तालुक्यामधील एका १८ वर्षांच्या आदिवासी तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आल्यानं खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचं अपहरण करुन तिच्यावर दोन आठवडे बलात्कार करण्यात आला.  

पीडित तरुणी शेजारच्या गावातून परतत असताना तिचं अपहरण करण्यात आलं. अपहरण करणारा मनिष वसावा पीडित तरुणीच्याच गावचा रहिवासी आहे. मनिषनं तरुणीला जबरदस्तीनं रिक्षात बसवलं आणि तो तिला सूरतला घेऊन आला. यानंतर त्यानं तिच्यावर एका खोलीत बलात्कार केला. दोन आठवडे मनिष तरुणीवर अत्याचार करत होता. यानंतर बुधवारी पीडितेला तिच्या गावी सोडण्यात आलं. घडलेल्या प्रकाराची वाच्यता न करण्याची धमकी मनिषनं तरुणीला दिली होती. दरम्यान तरुणी घरी न परतल्यानं तिच्या पालकांनी २६ मार्चला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पीडितेनं घरी पतरल्यावर संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली. 

'आम्ही या प्रकरणात पीडितेच्या जबाबावरुन तक्रार दाखल केली आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध सुरु आहे. बलात्कार करणारा आरोपी विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. या प्रकरणाची आणखी माहिती गोळा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत,' अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक एन. व्ही. तडवी यांनी दिली. याआधी सूरतमधील ओलपाड तालुक्यात दोन मुलींचं लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली. यामधील दोघेजण १९ वर्षांचे आहेत, तर एक आरोपी अल्पवयीन आहे. मंगळवारी हा संपूर्ण प्रकार घडला. पीडित मुली शिवण क्लासवरुन परतत असताना वेलूक गावचे रहिवासी असणाऱ्या तिघांनी मुलींना शेतात नेऊन त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तीन आरोपींपैकी एका १९ वर्षांच्या तरुणानं एका मुलीवर बलात्कार केला. तर इतर दोन आरोपींनी एका तरुणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. 
 

Web Title: Tribal girl abducted raped for two weeks in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.